शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
2
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
3
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
4
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
5
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
6
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
7
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
8
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
9
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
10
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
11
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
12
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
13
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
14
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
15
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
16
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
17
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
18
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
19
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:19 IST

अंता पोटनिवडणुकीत काँग्रेसचा एकतर्फी विजय झाला आहे. काँग्रेसने भाजपा उमेदवाराला १५ हजार मताधिक्यांनी हरवले आहे.  

बांरा - राजस्थानच्या अंता विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार प्रमोद भाया यांनी भाजपा उमेदवार मोरपाल सुमन यांना १५ हजार ५९४ मतांनी हरवले आहे. याठिकाणी अपक्ष उमेदवार नरेश मीणा तिसऱ्या स्थानावर राहिले. अंतामधील विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.  मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलापासून तिसऱ्या नंबरवर राहिलेले भाजपा उमेदवार मोरपाल सुमन यांना अखेरच्या राऊंडमध्ये १५९ मते जास्त मिळाल्याने त्यांनी नरेश मीणा यांना पिछाडीवर टाकत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. त्यामुळे राजस्थानात सत्ताधारी भाजपाची काही प्रमाणात इज्जत वाचली. 

राजस्थानातील पराभवानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत म्हटलं की, जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून आम्ही त्याचा सन्मान करतो असं सांगितले आहे. तर जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद मला भेटला, त्यासाठी मी आभारी आहे. आमची लढाई भ्रष्टाचाराविरोधात होती. प्रामाणिकपणा हरला आणि भ्रष्टाचार जिंकला. परमेश्वर आमची परीक्षा घेत आहेत, येणाऱ्या काळात आम्ही पुन्हा मजबुतीने उभे राहून काम करू असं अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांनी सांगितले.

अंता पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रमोद भाया यांना ६९ हजार ५७१ मते मिळाली तर भाजपाचे मोरपाल सुमन यांना ५३ हजार ९५९ मते मिळाली. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांनी चांगली लढत दिली. त्यांनी जवळपास ५३ हजार८०० मते घेऊन सगळ्यांना आश्चर्यचकीत केले. २० राऊंडच्या मतमोजणीत चौथा राऊंड सर्वात महत्त्वाचा होता. पहिल्या तीन राऊंडमध्ये भाया पुढे होते मात्र चौथ्या राऊंडमध्ये अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांनी आघाडी घेतली. या राऊंडमध्ये नरेश यांना १४ हजार १२ मते तर काँग्रेस उमेदवार प्रमोद भाया यांना १३ हजार ८६० मते पडली तर भाजपा उमेदवार मोरपाल सुमन यांना ९ हजार ६५९ मते मिळाली. मात्र नरेश मीणा यांना मिळालेली ही आघाडी पुढे टिकू शकली नाही.

दरम्यान, अंता पोटनिवडणुकीत काँग्रेसचा एकतर्फी विजय झाला आहे. काँग्रेसने भाजपा उमेदवाराला १५ हजार मताधिक्यांनी हरवले आहे.  ११ नोव्हेंबरला या जागेसाठी ८० टक्के रेकॉर्डब्रेक मतदान झाले होते. ही केवळ एका जागेची पोटनिवडणूक नव्हती, तर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारसाठी लिटमस टेस्ट मानली जात होती. याठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद जैन भाया रिंगणात होते. अंता मतदारसंघ हाडौती विभागात पडतो, जिथे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा गड मानला जातो. याठिकाणी एक्झिट पोलमध्ये भाजपाला जागा मिळेल असा अंदाज वर्तवला होता. परंतु प्रत्यक्षात निकालात काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Congress wins Anta by-election, BJP narrowly avoids major defeat.

Web Summary : Congress's Pramod Bhaya won the Anta by-election by 15,594 votes. BJP's candidate secured second place by a mere 159 votes, narrowly escaping a more significant defeat. The defeat was accepted by BJP state president Madan Rathore.
टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेसBJPभाजपा