शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून होतोय धनशक्तीचा वापर, राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 17:53 IST

काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार अस्थिर झाले आहे.

अहमदाबाद - काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार अस्थिर झाले आहे. दरम्यान, कर्नाटकमधील सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून धनशक्तीचा वापर सुरू आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे.  कर्नाटकमधील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राहुल गांधी यांनी या प्रकरणात भाजपाकडून सुरू असलेल्या सरकार पाडण्याच्या प्रयत्नांवर जोरदार टीका केली. ''कर्नाटकमधील सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून धनशक्तीचा वापर सुरू आहे. याआधी पूर्वोत्तर भारतामध्येही त्यांनी याचप्रकारे सत्तांतर घडवून आणल्याचे आपण पाहिले आहे.'' असे राहुल गांधी म्हणाले. 

अहमदाबादमधील एका न्यायालयात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यातील सुनावणीसाठी राहुल गांधी आज येथे आले होते. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे. न्यायालयातून बाहेर आल्यानंतर त्यांनी कर्नाटकातील घटनाक्रमावरून भाजपावर जोरदार टीका केली. दरम्यान, कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर येत्या मंगळवारपर्यंत निर्णय घेऊ नका, असा आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या मंगळवारी होणार आहे.  

कर्नाटकातील जनता दल (एस) आणि काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष आमचे राजीनामे मंजूर करण्यास नियमबाह्य पद्धतीने टाळाटाळ करत असल्याच आरोप करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर येत्या मंगळवारपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका, असा आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिला आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा