शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"शेतकऱ्यांची कुठलीही चिंता नाही, 'किसान महापंचायत'च्या मागे राजकीय अजेंडा"; भाजपाचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 08:33 IST

BJP termed kisan mahapanchayat held in muzaffarnagar as election rally : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाने मुझफ्फरनगरमध्ये रविवारी 'किसान महापंचायत' आयोजित केली होती.

नवी दिल्ली - भाजपाने मुझफ्फरनगरमध्ये 'किसान महापंचायत' नाही तर 'निवडणूक सभा' होत असल्याचं म्हटलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चा राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप देखील आता भाजपाने केला आहे. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाने मुझफ्फरनगरमध्ये रविवारी 'किसान महापंचायत' आयोजित केली होती. यामध्ये उत्तर प्रदेश आणि शेजारी राज्यांमधील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. भाजपाने यावरून जोरदार निशाणा साधत हल्लाबोल केला आहे. "शेतकऱ्यांची चिंता नाही, 'किसान महापंचायत'च्या मागे राजकीय अजेंडा" असल्याचं म्हटलं आहे.

भाजपाचे किसान मोर्चाचे प्रमुख आणि खासदार राजकुमार चाहर यांनी 'किसान महापंचायत'च्या मागे राजकीय अजेंडा आहे. त्यांना शेतकऱ्यांची कुठलीही चिंता नाही. ही 'किसान महापंचायत' नाही, तर राजकीय निवडणूक बैठक होती. विरोधी पक्ष आणि किसान संघटना राजकारणासाठी शेतकऱ्यांचा दुरुपयोग करत आहेत असं म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या सात वर्षांत जे काम शेतकऱ्यांसाठी केले आहे तितके काम कुठल्याच सरकारने केलेलं नाही असा दावा देखील चाहर यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या नव्या कृषा कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या अनेक संघटना गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत.

"उत्तर प्रदेश निवडणुकांआधी होणार मोठ्या हिंदू नेत्याची हत्या"; राकेश टिकैत यांचं वादग्रस्त विधान

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी (Rakesh Tikait) पुन्हा एकदा भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपापेक्षा घातक कोणताच पक्ष नाही असं म्हणत हल्लाबोल केला आहे. सिरसामध्ये ते बोलत होते. तसेच टिकैत यांनी य़ाच दरम्यान एक वादग्रस्त विधान देखील केलं आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांआधी (Uttar Pradesh Election) एखाद्या मोठ्या हिंदू नेत्याची हत्या होऊ शकते असं म्हटलं आहे. हरियाणाच्या सिरसामध्ये शेतकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी भाजपा सरकारवर गंभीर आरोप केला. 

"भाजपापेक्षा धोकादायक इतर कोणता पक्ष नाही"

"उत्तर प्रदेश निवडणुकांच्या आधी एखाद्या मोठ्या हिंदू नेत्याची हत्या होणार आहे. त्यामुळे यांच्यापासून सावध राहा आणि हे एका मोठ्या हिंदू नेत्याची हत्या करून देशात हिंदू-मुसलमान या मुद्द्यावरुन निवडणूक जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत" असं देखील राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. "भाजपापेक्षा धोकादायक इतर कोणता पक्ष नाही. ज्या लोकांनी भाजपाची निर्मिती केली, आज त्याच नेत्यांनाही घरात कैद करून ठेवण्यात आलं आहे" असं टिकैत यांनी म्हटलं आहे. या "देशावर सरकारी तालिबानींचा कब्जा आहे. ज्या SDM ने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला त्यांचे चुलते RSS मध्ये मोठ्या पदावर आहे. हे आम्हाला खालिस्तानी म्हणत असतील तर आम्ही यांना तालिबानी म्हणू" असं ही टिकैत म्हणाले. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीBJPभाजपाPoliticsराजकारणrakesh tikaitराकेश टिकैत