शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरच्या जाहिरातींमध्ये भाजपा समर्थक आघाडीवर; अमित शहांनीही केले लाखो खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 15:40 IST

निवडणूक काळात फेसबुकच्या प्लॅटफॉर्मचा वापर सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केला जातो. तसेच अफवाही पसरविल्या जातात.

नवी दिल्ली : फेसबुकवरनिवडणूक जाहिरातींमध्ये भाजपा आणि समर्थक सर्वात पुढे आहेत. फेसबुकच्या एका अहवालामध्येच याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यानुसार फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान एकूण 16,556 जाहिराती देण्यात आल्या. यासवर 4.13 कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. यापैकी 50 टक्क्यांहून जादाचा खर्च केवळ भाजपा आणि समर्थकांनी केल्याचे म्हटले आहे. तर व्यक्तीगत स्वरुपात सर्वाधिक खर्च करण्यामध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचा नंबर आहे. 

निवडणूक काळात फेसबुकच्या प्लॅटफॉर्मचा वापर सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केला जातो. तसेच अफवाही पसरविल्या जातात. यामुळे अमेरिकेच्या निवडणुकीनंतर फेसबुकने कठोर नियम केले असून नुकतेच काँग्रेस, भाजपाची पेजेस कायमची बंद केली आहेत. मात्र, जाहिराती करण्यास फेसबुकने मनाई केलेली नाही. 

भाजपाचे समर्थक फेसबूक पेज "भारत के मन की बात"ने निवडणुकीच्या जाहिरातबाजीवर सर्वाधिक पैसे मोजले आहेत. त्यांनी 1.01 कोटी रुपये खर्च केले आहेत. या पेजवरून एका महिन्यात 1168 जाहिराती देण्यात आल्या. या पेजवर 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, त्यांना मोदी सरकारचे काम दाखविण्यात आले. तर दुसऱ्या क्रमांकावर "नेशन विद नमो" हे मोदी समर्थकांचे दुसरे पेज असून त्यांनी महिनाभरात 631 जाहिराती दाखविल्या. यासाठी त्यांनी 52.24 लाख रुपये खर्च केले. तर क्षेत्रिय पक्षांनी फेसबुकवर जाहिरातींसाठी 20 लाख रुपये खर्च केले आहेत. यामध्ये काँग्रेस आणि समर्थकांनी केवळ 10 लाख रुपये खर्च केले आहेत. 

नवीन पटनायक आघाडीवर फेसबुकवर व्यक्तीगत जाहिराती देण्यामध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आघाडीवर आहेत. त्यांनी 4.48 लाख रुपये खर्च केले आहेत. तर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी 2.08 लाख रुपये खर्च करत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर भाजपाचे आमदार नरेंद्र खीचर, चौथ्या क्रमांकावर भाजपाचेच मुरलीधर राव आणि पाचव्या नंबरवर वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी आहेत.

टॅग्स :FacebookफेसबुकAmit Shahअमित शहाBJPभाजपाcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक