शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

"बांगलादेशमधील हिंदूंविरोधातील हिंसाचाराचा भाजपा सरकार निषेध का करत नाही, आपण त्यांना घाबरतो का?"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 3:12 PM

BJP Subramanian Swamy And Modi Government : भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारवरच हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - बांगलादेशातहिंदूंच्या 66 घरांची नासधूस करण्यात आली आणि जवळपास 20 घरे जाळण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यात दुर्गा पूजेदरम्यान मंदिर तोडफोडीच्या घटनांनंतर कथित निंदनीय मीडिया पोस्टवरून बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला. बीडीन्यूज24 डॉट कॉमच्या अहवालानुसार हा हल्ला रविवारी रात्री उशिरा राजधानी ढाकापासून 255 किमी अंतरावर असलेल्या गावात झाला. याच दरम्यान भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी (BJP Subramanian Swamy) यांनी मोदी सरकारवरच (Modi Government) हल्लाबोल केला आहे. बांगलादेशमध्ये (Bangladesh) झालेल्या हिंसाचारावरून त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 

सुब्रमण्यम स्वामी यांनी बांगलादेशमधील परिस्थितीवरून प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच बांगलादेशमधील हिंदूंविरोधातील हिंसाचाराच्या वाढत्या घटनांचा भाजपा सरकार निषेध का करत नाही? असं म्हटलं आहे. यासोबतच आपण मालदीवला देखील घाबरणार आहोत का? असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "बांगलादेशमधील हिंदूंविरोधातील हिंसाचाराच्या वाढत्या घटनांचा भाजपा सरकार निषेध का करत नाही? आपण बांगलादेशला घाबरतो का? असा सवाल उपस्थित करत टोला लगावला आहे. 

"आपण मालदीवला देखील घाबरणार आहोत का?"

"लडाखमधील चीनी अतिक्रमणाच्या भीतीनंतर आपण तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेण्याच्या मुद्द्यावर देखील माघार घेतली आणि त्यांच्याशी चर्चेची तयारी दाखवली. आता पुढे आपण मालदीवला देखील घाबरणार आहोत का?" असं देखील सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलं आहे. बांगलादेशच्या चटगांव विभागातील कुमिला येथील दुर्गा पूजेच्या ठिकाणी निंदा केल्याच्या कथित घटनेनंतर जातीय तणाव वाढला आहे, ज्यामुळे हिंदू मंदिरे आणि कमिल्ला, चांदपूर, चॅटोग्राम, कॉक्स बाजार, बंदरबन, येथील मंदिरांवर हल्ले झाले. मौलवी बाजार, गाझीपूर, चापैनवाबगंज, फेनी आणि इतर जिल्ह्यांमध्ये तोडफोड आणि पोलिसांशी चकमक झाली. सोशल मीडियावर हल्ला आणि जातीय द्वेष पसरवणाच्या आरोपाखाली काही लोकांना अटक करण्यात आली आहे, असे अहवालात म्हटले आहे. 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपाBangladeshबांगलादेशHinduहिंदू