शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
3
रशियाचं भारतप्रेम वाढलं! कच्चं तेल-गॅसनंतर आता दिली 'ही' मोठी ऑफर; अमेरिकेला लागणार झटका?
4
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
5
नेपाळमध्ये पुन्हा भडकलं Gen Z आंदोलन, युवक रस्त्यावर उतरले; कर्फ्यू लागू, एअरपोर्ट सेवा बंद
6
Mumbai: जोडीदाराकडून आत्महत्येची वारंवार धमकी ही क्रूरताच: मुंबई उच्च न्यायालय
7
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; Nifty २६,१०० च्या जवळ, मेटल-ऑटो शेअर्समध्ये खरेदी
8
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
9
लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत घुसून मारू; हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याची PoKची कबुली
10
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
11
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
12
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
13
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
14
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
15
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
16
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
17
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
18
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
19
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
20
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 08:36 IST

जवळपास ५० मिनिटे अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत महायुतीतील तक्रारीचा पाढा शिंदे यांनी शाहांसमोर वाचून दाखवला. त्यात प्रामुख्याने राग भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर होता.

नवी दिल्ली - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे वगळता शिंदेसेनेच्या एकाही मंत्र्‍यांनी हजेरी लावली नाही. या मंत्र्‍यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठली. याठिकाणी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. जवळपास ५० मिनिटे या दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीत शिंदे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीची तक्रार केली.

एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील राजकारणावरून शाहांकडे तक्रार केली. विशेषत: सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण डोंबिवली क्षेत्रात शिंदेसेनेच्या अनेक माजी पदाधिकारी, नगरसेवकांना गळाला लावण्याचं काम रवींद्र चव्हाण यांच्याकडून केले जात आहे. आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना फोडून भाजपात प्रवेश दिला जात आहे. हे राजकारण आगामी निवडणुकीत महायुतीला अडचणीत आणू शकते. त्यातून वातावरण दूषित करण्याचा काहींचा प्रयत्न आहे असं त्यांनी शाहांना सांगितले.

तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीसाठी पोषक वातावरण आहे. परंतु काही नेते त्यांच्या स्वार्थासाठी हे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यामुळे विरोधकांना त्याचा अनावश्यक फायदा मिळत आहे. माध्यमांमधून महायुतीबाबत चुकीचे चित्र समोर येत आहे. ज्यामुळे जनतेत गोंधळ निर्माण होत आहे. काही नेते वैयक्तिक स्वार्थासाठी काम करत आहेत, ही वागणूक रोखण्यासाठी पाऊले उचलायला हवीत. युतीतील नेत्यांनी एकमेकांवरील टीका टाळायला हवी. सार्वजनिक विधाने करताना संयम बाळगणे, सुसंवाद ठेवणे ही अपेक्षा आहे. भाजपाच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांना हे कळवलं आहे असंही एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांना म्हटलं.

दरम्यान, जवळपास ५० मिनिटे अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत महायुतीतील तक्रारीचा पाढा शिंदे यांनी शाहांसमोर वाचून दाखवला. त्यात प्रामुख्याने राग भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर होता. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात मी रडणारा नाही लढणारा आहे. मी स्थानिक मुद्दे राष्ट्रीय पातळीवर आणत नाही. बिहार निवडणुकीत एनडीएचे ५ घटक एकत्र आले तेव्हा निकाल चांगले लागले, महाराष्ट्रातही हे आपण पाहिले आहे असं शिंदे यांनी सांगितले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde complains to Shah about Chavan's actions harming alliance.

Web Summary : Shinde met Shah, complaining about Chavan weakening the Shinde Sena in Thane, especially Kalyan-Dombivali. He fears this will damage the Mahayuti alliance in upcoming local elections and benefit the opposition.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRavindra Chavanरविंद्र चव्हाणBJPभाजपाMahayutiमहायुतीAmit Shahअमित शाहDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस