सत्तेसाठी भाजपने लाचार होऊ नये; अन्यथा जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल : कमलनाथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 16:41 IST2020-03-07T16:40:29+5:302020-03-07T16:41:52+5:30
भाजपच्या नेत्यांनी केवळ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला नसून राज्याच्या विकासावर आक्रमण केले आहे. शेतकरी आणि युवकांच्या उज्ज्वल भवितव्यावर भाजपने वार केल्याचे कमलनाथ म्हणाले.

सत्तेसाठी भाजपने लाचार होऊ नये; अन्यथा जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल : कमलनाथ
नवी दिल्ली - मध्य प्रदेशात सुरू असलेल्या राजकीय नाट्यामध्ये आता कमलनाथ यांनी जनतेसाठी लिहिलेल्या खुल्या पत्राची भर पडली आहे. या पत्रात कमलनाथ यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसेच मध्यप्रदेश सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे प्रयत्न निंदणीय असल्याचे कमलनाथ यांनी म्हटले.
भाजपच्या नेत्यांनी राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राज्याच्या विकासावर देखील परिणाम झाला आहे. सत्तेची लालसा भाजप नेत्यांनी एवढी ठेवू नये की, जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल, अशी खोचक टीका कमलनाथ यांनी भाजपवर केली.
भगवान हनुमान भाजपला मर्यादा, संयम आणि चारित्र्यसंपन्नता देवो जेणेकरून सत्ताधारी आणि विरोधीपक्ष राज्याच्या विकासासाठी काम करू शकेल, असंही कमलनाथ यांनी म्हटले. भाजपने सत्तेसाठी केलेले प्रयत्न मध्य प्रदेशच्या गौरवशाली इतिहासाला कलंक लावणारे आहेत. एवढे वाईट कृत्य करण्याची प्रेरणा भाजपला मिळते कुठून असा प्रश्न कमलनाथ यांनी जनतेला लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला.
दरम्यान भाजपच्या नेत्यांनी केवळ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला नसून राज्याच्या विकासावर आक्रमण केले आहे. शेतकरी आणि युवकांच्या उज्ज्वल भवितव्यावर भाजपने वार केल्याचे कमलनाथ म्हणाले.