शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

No Confidence Motion : 'बन्द करो ये झूठ का फाटक...'; राहुल गांधींच्या 'झप्पी'ला भाजपाचं कवितेतून प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 15:50 IST

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात  गेल्या शुक्रवारी लोकसभेत मांडल्या गेलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट हीच सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. मात्र या गळाभेटीवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून

नवी दिल्ली  - नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात  गेल्या शुक्रवारी लोकसभेत मांडल्या गेलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट हीच सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. मात्र या गळाभेटीवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, राहुल गांधींच्या या गळाभेटीला भाजपाने  कवितेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केले. मात्र भाषण संपल्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदींची घेतलेला गळाभेट आणि नंतर आपल्या शेजारी बसलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना मारलेला डोळा यामुळे भाजपा नेत्यांना त्यांच्याविरोधात आयतेच कोलीत मिळाले. तेव्हापासून भाजपाच्या मंत्र्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांनी राहुल गांधींना टीकेचे लक्ष्य करणे सुरू ठेवले आहे. दरम्यान, सोमवारी भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक कविता शेअर केली आहे. "70 साल प्यार का नाटक, बंद करो झूट का फाटक या आशयाच्या या कवितेमधून राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.  

भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनीही राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना 1984 ची दंगल आणि भागलपूर दंग्यांची आठवण करून दिली. देशात असा कुठलाही मुद्दा नाही ज्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत, असे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. 

  केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनीही राहुल गांधींना टीकेचे लक्ष्य केले आहे. राहुलजी कुठलीही दुर्घटना घडल्यावर त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणे बंद करा. सरकारने या प्रकरणी कठोर कारवाई केली आहे. तुम्ही राजकीय लाभासाठी समाजात फूट पाडत आहात, अशा शब्दार पियूष गोयल यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.  

शुक्रवारी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घेतलेल्या गळाभेटीवरून लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी राहुल गांधींना खडेबोल सुनावले होते. मात्र काँग्रेसने याचा राजकीय लाभ घेण्यास सुरुवात करताना मुंबईत पोस्टरबाजी केली होती. तसेच द्वेषाने नाही तर प्रेमाने जिंकणार, असा संदेशही दिला होता.  

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसSmriti Iraniस्मृती इराणीpiyush goyalपीयुष गोयल