गुजरात निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 12:15 PM2022-11-10T12:15:17+5:302022-11-10T12:15:53+5:30

Gujarat Assembly Election 2022 : गुजरातमधील 160 विधानसभा जागांसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

bjp releases first list of its candidates for gujarat assembly election 2022 | गुजरात निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार

गुजरात निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार

googlenewsNext

गुजरात विधानसभा निवडणूक 2022 साठी (Gujarat Assembly Election 2022) गुरुवारी भाजपने (BJP) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या पत्नीलाही भाजपने तिकीट दिले आहे. गुजरात निवडणुकीसाठी भाजपने राजकोट पश्चिममधून दर्शिता पारशा, कलवारमधून मेघजी भाई, पोरबंदरमधून बाबूभाई पोखरिया आणि जुनागडमधून संजय भाई यांना तिकीट दिले आहे. तर जितूभाई सोमाणी यांनाही भाजपचे तिकीट मिळाले आहे.

गुजरातमधील 160 विधानसभा जागांसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने 14 महिला उमेदवार आणि 69 विद्यमान आमदारांना तिकीट दिले आहे. याशिवाय, भाजपने 13 अनुसूचित जाती आणि 14 अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना तिकीट दिले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे भाजपच्या तिकीटावर घाटलोडियातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्याचबरोबर, गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी हे मजुरा येथून निवडणूक लढवणार आहेत. तसेच, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले हार्दिक पटेल हे विरमगाममधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

मोरबीचे तिकीट कोणाला मिळाले?
भाजपने अबडासामधून प्रद्युम्नसिंग जडेजा, मांडवीमधून अनिरुद्ध भैलाल दवे, भुजमधून केशवलाल पटेल, अंजारमधून त्रिकमभाई बिजलभाई छांगा, गांधीधाममधून मालतीबेन माहेश्वरी, रापरमधून वीरेंद्रसिंह बहादूरसिंह जडेजा, दसाडामधून परषोत्तमभाई परमार, लिम्बडीमधून किरीटसिंह राणा, चोटीलामधून शामजीभाई चौहान, मोरबीमधून कांतीलाल अमृतिया, राजकोट पूर्वमधून उदयकुमार आणि राजकोट दक्षिणमधून रमेशभाई यांना तिकीट देण्यात आले आहे.

संजयभाई जुनागडमधून निवडणूक लढवणार
राजकोट ग्रामीणमधून भानुबेन, जसदणमधून कुंवरजीभाई बावलिया, गोंडलमधून गीताबा, जेतपूरमधून जयेशभाई, कालावदमधून मेघजीभाई, जामनगर ग्रामीणमधून राघवजीभाई, जामनगर उत्तरमधून रिवाबा जडेजा, जामनगर दक्षिणमधून दिव्येश अकबरी, जामजोधपूरमधून चिमणभाई, द्वारकामधून पबुभा माणेक, जुणागढमधून संजयभाई, विसावदरमधून हर्षदभाई आणि केशोदमधून देवाभाई यांना भाजपचे तिकीट मिळाले आहे.

ऊनामधून काळूभाई राठोड यांना मिळाले तिकीट
याचबरोबर, भाजपने मांगरोलमधून भगवानजीभाई, सोमनाथमधून मानसिंग परमार, तलालामधून भगवानभाई बारड, कोडनारमधून प्रद्युम्न वाजा, ऊनामधून काळूभाई राठोड, धारीतून जयसुखभाई काकडिया, अमरेलीतून कौशिकभाई, लाठीतून जनकभाई, सावरकुंडमधून महेश कासवाला, राजूलामधून हीराभाई, महुवामधून शिवाभाई, तळाजामधून गौतमभाई, गारियाधरमधून केशुभाई, पालिताना भिखाभाई आणि भावनगर ग्रामीणमधून परषोत्तमभाई सोलंकी यांना तिकीट देण्यात आले आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम
गुजरातमधील विधानसभेच्या एकूण 182 जागांपैकी 89 जागांसाठी 1 डिसेंबरला आणि उर्वरित 93 जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीची अधिसूचना अनुक्रमे 5 नोव्हेंबर आणि 10 नोव्हेंबरला जारी करण्यात येणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख अनुक्रमे 14 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर असणार आहे.

याचबरोबर,  15 नोव्हेंबर आणि 18 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख अनुक्रमे 17 नोव्हेंबर (टप्पा पहिला) आणि 21 नोव्हेंबर (टप्पा दुसरा) ठेवण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणुकांसोबतच 2023 मध्ये होणाऱ्या अन्य काही राज्यांच्या निवडणुका 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
 

Web Title: bjp releases first list of its candidates for gujarat assembly election 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.