शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
3
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
4
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
5
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
6
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
7
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
8
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
9
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
10
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
11
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
12
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
13
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
14
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
15
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
16
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
17
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
18
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
19
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
20
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
Daily Top 2Weekly Top 5

भाजप धक्का देण्याच्या तयारीत, फोडाफोडी रोखण्यासाठी आमदार जयपुरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 06:23 IST

राजस्थान : आमदार फोडाफोडी रोखण्यासाठी काँग्रेस निरीक्षक जयपूरमध्ये

नवी दिल्ली/जयपूर : मध्यप्रदेशापाठोपाठ राजस्थानातील काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न भाजप नेते करीत असल्याच्या वृत्तामुळे काँग्रेसने आपल्या १०७ आणि १२ अपक्ष आमदारांना जयपूरमधील एका रिसॉर्टमध्ये नेऊन ठेवले आहे. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी के.सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांना ताबडतोब जयपूरला पाठवले.

ज्या पद्धतीने कमलनाथ सरकार पाडले, त्याच प्रकारे गेहलोत सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यासाठी काँग्रेस आणि अपक्ष आमदारांना कोट्यवधी रुपयांची लालूच दाखविण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी केला. तशी तक्रार काँग्रेसने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही केली आहे. राजस्थान विधानसभेतून राज्यसभेवर तीन जणांना निवडून पाठवायचे असून, ती निवडणूक १९ जून रोजी होणार आहे. संख्याबळाच्या आधारे काँग्रेसचे दोन आणि भाजपचा १ उमेदवार निवडून येऊ शकतो; पण भाजपने दोन उमेदवारांची घोषणा केली. त्यामुळे आमचे व अपक्ष आमदार फोडण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केल्याचा आरोप काँग्रेसने केला. मध्यप्रदेशात ज्या प्रकारे ज्योतिरादित्य सिंदिया यांना फोडले, तसे राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना फोडले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. ते फुटले, तर त्यांच्याबरोबर बरेच आमदार बाहेर पडतील, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर लगेच काँग्रेसच्या सर्व आमदारांना बुधवारी रात्री शिव विलास रिसॉर्टमध्ये नेण्यात आले. अशोक गेहलोत, वेणुगोपाल आणि सुरजेवाला यांनी आज या व अपक्ष आमदारांशी चर्चा केली. या बैठकीला सचिन पायलट हेही हजर होते.आम्ही कोणत्याही स्थितीत काँग्रेसमधून बाहेर पडणार नाही, भाजपमध्ये जाणार नाही वा भाजपच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, असे आश्वासन या आमदारांनी नेत्यांना दिले. तरीही मध्यप्रदेशपासून धडा घेऊन येथील नेते अधिक सतर्क झाले आहेत.कमलनाथ कायम केंद्रीय राजकारणात होते. त्यांना मध्यप्रदेशच्या राजकारणाचा अनुभव नव्हता. त्याचा फटका त्यांना बसला. शिवाय सिंदिया यांच्याबरोबर जे आमदार गेले, त्यांची तिथे जी फरपट झाली, ती पाहून राजस्थानातील एकही आमदार भाजपकडे जाणार नाही, तसेच गेहलोत यांना राज्याचे राजकारण नीट ठाऊक आहे. ते भाजपला पुरून उरतील, असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.असे असले तरी काँग्रेस नेते सर्व शक्यता लक्षात घेऊन अधिक दक्ष असल्याचे दिसत आहेत. सचिन पायलट यांच्याशी हे नेते सतत संपर्कात आहेत, असे सांगण्यात आले.गुजरातचे आमदारही जयपुरातभाजपने गुजरातमधील तीन आमदार गेल्या आठवड्यात फोडले. त्या तिघांनी आमदारकीचे राजीनामे दिले. त्यामुळे गुजरातच्या सर्व काँग्रेस आमदारांना याच रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. गुजरातमध्येही१९ जूनलाच राज्यसभा निवडणूक आहे. तिथे काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.आरोप खोटे : भाजपकाँग्रेसचे राजस्थानातील आमदार फोडण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, हा आरोप खोटा असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्या पक्षाला स्वत:चे आमदार टिकवून ठेवता येत नाहीत. त्या पक्षामध्ये नाराजी आहे. त्यास आम्ही जबाबदार नाही, असे भाजपचे म्हणणे आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपाMLAआमदार