भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वरुण गांधी आणि मनेका गांधी यांना स्थान नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 02:36 PM2021-10-07T14:36:02+5:302021-10-07T14:42:23+5:30

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज पक्षाच्या 80 सदस्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे.

BJP rashtriya karyakarini, bjp national executive committee, varun gandhi maneka gandhi not in the list | भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वरुण गांधी आणि मनेका गांधी यांना स्थान नाही

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वरुण गांधी आणि मनेका गांधी यांना स्थान नाही

googlenewsNext

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाकडून नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा गुरुवारी करण्यात आली. पण, यात भाजप नेते खासदार वरुण गांधी आणि त्यांच्या आई मनेका गांधी यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर ठेवण्यात आलं आहे. वरुण गांधी मागील काही काळापासून सरकारच्या धोरणांविरोधात आणि आता नुकत्याच झालेल्या लखीमपूरच्या घटनेवरुन सरकारवर टीका करत होते. त्यांच्या याच टीकेचा फटका त्यांना बसला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज पक्षाच्या 80 सदस्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अभिनेते मिथून चक्रवर्ती आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनाही या राष्ट्रीय कार्यकारी स्थान मिळालं आहे. 

या नेत्यांचा समावेश
भाजपने राष्ट्रीय कार्य समितीमध्ये 80 सदस्यांचा समावेश केला आहे. यात रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन, एस जयशंकर, गिरीराज सिंह, रमेश बिधुरी, मनोज तिवारी, श्रीपाद नायक, मीनाक्षी लेखी, अनुराग ठाकूर, डॉ जितेंद्र सिंह, पहलादा जोशी, निर्मला सीतारमण, मुरलीधरन, नरेंद्र सिंह तोमर, ज्योतिरादित्य सिंधिया, नरोत्तम मिश्रा, धर्मेंद्र प्रधान, हरदीप सिंग पुरी, सोम प्रकाश, ओम प्रकाश माथुर, गजेंद्र सिंह शेखावत, जसकौर मीना, जी किशन रेड्डी, स्मृती इराणी, मुख्तार अब्बास नकवी, संतोष गंगवार, साध्वी निरंजन ज्योती, मिथुन चक्रवर्ती, अनिल जैन, संजीव बाल्यान, दिनेश त्रिवेदी, अनिर्बन गांगुली इत्यादींचा समावेश आहे.

13 उपाध्यक्षांची निवड
यासह राष्ट्रीय उपाध्यक्षपदासाठी 13 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये छत्तीसगडचे डॉ.रमण सिंह, राजस्थानचे वसुंधरा राजे शिंदे, बिहारचे राधा मोहन सिंग, चंदीगडचे सौदन सिंह, ओडिशाचे बैजयंत जय पांडा, झारखंडचे रघुवर रस, पश्चिम बंगालचे दिलीप घोष, बेबी राणी मौर्य आणि रेखा यांचा उत्तर प्रदेशातून समावेश आहे. तर, गुजरातमधून डॉ.भारती बेन शियाल, तेलंगणातून डीके अरुणा, नागालँडचे एम चुबा आओ आणि केरळमधील अब्दुल्ला कुट्टी यांचा समावेश करण्यात आला आहे.
 

Web Title: BJP rashtriya karyakarini, bjp national executive committee, varun gandhi maneka gandhi not in the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.