भाजपाध्यक्ष अमित शाह यांना स्वाइन फ्लू, एम्समध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 22:38 IST2019-01-16T22:12:56+5:302019-01-16T22:38:22+5:30
भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या मागे लागलेले आजापणांचे शुक्लकाष्ट थांबण्याचे नाव घेत नसून, आता भाजपाध्यक्ष अमित शाह हे आजारी पडले आहेत.

भाजपाध्यक्ष अमित शाह यांना स्वाइन फ्लू, एम्समध्ये दाखल
नवी दिल्ली - भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या मागे लागलेले आजापणांचे शुक्लकाष्ट थांबण्याचे नाव घेत नसून, आता भाजपाध्यक्षअमित शाह हे आजारी पडले आहेत. अमित शाह यांना स्वाइन फ्लू झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमित शाह यांनी ट्विटरवरून आपल्या आजारपणाची माहिती दिली आहे. मला स्वाइन फ्लू झाला असून, त्यावर उपचार सुरू आहेत. ईस्वराची कृपा, तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या जोरावर लवकरच बरा होईन, असे शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. सध्या अमित शाह यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती सुरू आहे.
मुझे स्वाइन फ्लू हुआ है, जिसका उपचार चल रहा है। ईश्वर की कृपा, आप सभी के प्रेम और शुभकामनाओं से शीघ्र ही स्वस्थ हो जाऊंगा।
— Amit Shah (@AmitShah) January 16, 2019