BJP is preparing for elections in Delhi too | दिल्लीतही भाजपची निवडणुकीची तयारी
दिल्लीतही भाजपची निवडणुकीची तयारी

- एस. के. गुप्ता 

नवी दिल्ली : भाजपने दिल्लीत पूर्वांचलच्या मतदारांबरोबरच मराठी, तामिळ, कन्नड मतदारांना आकर्षित करण्यासाठी या राज्यांच्या बड्या नेत्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी आणण्याची तयारी सुरू केली आहे. आम आदमी पार्टीचा आक्रमक प्रचार पाहून भाजपने पूर्वांचलचे मतदार, तसेच दक्षिण व पश्चिम भारतातील मतदारांनाही आपलेसे करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दिल्लीचे तीन भाग हरियाणाला लागून असल्यामुळे भाजपची ही तयारी सुरू आहे. त्यामुळे हरियाणातील निवडणुकीवरही प्रभार पडतो. दिल्लीतही असे काही भाग विकसित झाले आहेत की, जेथे काळानुरूप महाराष्टÑ, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकच्या मतदारांची संख्या वाढली आहे. भाजपचे म्हणणे आहे की, महाराष्टÑाच्या निवडणुकीचा दिल्लीतही मराठीबहुल भागांमध्ये प्रभार दिसेल.


Web Title: BJP is preparing for elections in Delhi too
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.