शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

"विधानसभा अपवित्र केली, आम्ही गोमुत्राने...", काँग्रेस नेत्याचा भाजप सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 11:45 IST

DK Shivakumar : काँग्रेसच्या कार्यकाळात प्रकल्पांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत भाजपकडून तक्रार करण्यात आली. यावरून काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.

बंगळुरू : कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (KPCC) अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) हे सातत्याने आपल्या विधानमुळे चर्चेत असतात. यावेळी, त्यांनी भाजपने (BJP) विधानसभा अपवित्र केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच आपला पक्ष सत्तेवर आल्यास गोमूत्र आणि डेटॉलने विधानसभेची स्वच्छता करू, असेही म्हटले आहे. यामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण तापले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार,  भाजपवर निशाणा साधताना डीके शिवकुमार म्हणाले की, "तुमच्या सरकारला फक्त 40-45 दिवस उरले आहेत. आपला तंबू बांधण्याची वेळ आली आहे. आम्ही डेटॉलने विधानसभा स्वच्छ करू. शुद्धीकरणासाठी माझ्याकडे गोमूत्रही आहे. हे दुष्ट सरकार गेले पाहिजे, हीच जनतेची इच्छा आहे. बोम्मईजी, तुम्ही सर्व मंत्र्यांना लवकर पॅक अप करायला सांगितले तर बरे होईल."

काँग्रेसच्या कार्यकाळात 'टेंडरशुअर' प्रकल्पांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत भाजपकडून तक्रार करण्यात आली. यावरून काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, या तक्रारीच्या पहिल्या दिवसापासून भाजप काँग्रेसच्या निशाण्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी कॅगच्या अहवालाचा हवाला देत सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारवर मोठा आरोप केला आहे. या काळात 35,000 कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, के. सुधाकर यांच्या आरोपाला उत्तर देताना डीके शिवकुमार म्हणाले की, "भाजप गेली साडेतीन वर्षे काय करत आहे. ते सत्तेत होते आणि त्यांनी चौकशीचे आदेश देऊन, चौकशी करायला हवी होती. भाजपकडे 40 टक्के कमिशनचा 'ब्रँड' आहे आणि त्यांना तो लपवायचा आहे. त्यामुळेच ते वारंवार काँग्रेसवर बिनबुडाचे आरोप करण्याचा प्रयत्न करत आहेत."

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस