भाजपा-पीडीपी आघाडीने जम्मू-काश्मीरला बर्बाद केले - गुलाम नबी आझाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 15:46 IST2018-06-19T15:46:14+5:302018-06-19T15:46:14+5:30

भाजपा आणि पीडीपीने मिळून राज्याला बर्बाद केले, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबा आझाद यांनी केली.

BJP-PDP alliance ruined Jammu and Kashmir - Ghulam Nabi Azad | भाजपा-पीडीपी आघाडीने जम्मू-काश्मीरला बर्बाद केले - गुलाम नबी आझाद

भाजपा-पीडीपी आघाडीने जम्मू-काश्मीरला बर्बाद केले - गुलाम नबी आझाद

नवी दिल्ली - भाजपा आणि पीडीपीचे सरकार कोसळले हे चांगलेच झाले. हे सरकार कोसळल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील जनतेला थोडासा दिलासा मिळाला आहे. कारण भाजपा आणि पीडीपीने मिळून राज्याला बर्बाद केले, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबा आझाद यांनी केली. तसेच पीडीपीला काँग्रेस पाठिंबा देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या राजकीय भूकंपावर प्रतिक्रिया देताना आझाद  म्हणाले, जम्मू-काश्मीरला भाजपा आणि पीडीपीच्या आघाडी सरकारने बर्बाद केले. या सरकारच्या कार्यकाळात सर्वात जास्त वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले.  सर्वाधिक सैनिक शहीद झाले. सर्वसामान्य नागरिकांचे मृत्यू झाले. त्यामुळे राज्याची वाट लावल्यानंतर आता हे पक्ष आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाहीत. 
 



 

Web Title: BJP-PDP alliance ruined Jammu and Kashmir - Ghulam Nabi Azad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.