शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'समाजवादी पक्षात औरंगजेबाचा आत्मा', अबू आझमींच्या युपीच्या उपमुख्यमंत्र्यांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 15:37 IST

BJP on Abu Azmi Statement : अबू आझमींनी औरंगजेबावर केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे.

BJP on Abu Azmi Statement : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू असीम आझमी यांनी औरंगजेबावर केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. भाजपसह काँग्रेस अन् राष्ट्रवादी(शप) पक्षाच्या नेत्यांनींही अबू आझमींवर कारवाईची मागणी केली आहे. अशातच, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीदेखील आझमींसह समाजवादी पक्षावर निशाणा साधला आहे. 

'भारत देश कोणत्याही परिस्थितीत भगवान शंकराचा अपमान सहन करणार नाही. याचे उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील जनताच देईल. त्यांच्या संरक्षणाखाली सर्व देशद्रोही शक्ती फोफावतात, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मुघल आक्रमकांनी देशाची संस्कृती उद्धवस्त केली, पण भारतीय संस्कृतीने जगाला रस्ता दाखवण्याचे काम केले. समाजवादी पक्षात औरंगजेबाचा आत्मा घुसला आहे. अखिलेश यादव यांनी माफी मागावी आणि अबू आझमींवर कारवाई करावी', अशी टीका केशव प्रसाद मौर्य यांनी केली.

काय म्हणाले अबू आझमी?सपा नेते अबू असीम आझमी म्हणाले होते की, औरंगजेब क्रूर आणि असहिष्णू शासक नव्हता. त्याने अनेक मंदिरेही बांधली होती. औरंगजेबाने मंदिरे पाडली तर मशिदीही पाडल्या. हिंदू आणि मुस्लिम असा भेद करण्याची गरज नाही. औरंगजेबाबाबत चुकीचा इतिहास दाखवला जातो. 

विधानसभेबाहेर निदर्शनेमहाराष्ट्र विधानसभेबाहेर भाजप-शिवसेनेच्या नेत्यांकडून अबू आझमींविरोधात निदर्शने करण्यात आली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा दावा करत अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना विधानसभेत प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी केली.

अबू आझमींविरोधात एफआयआरअबू आझमींनी केलेल्या वक्तव्याबाबत मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये सीआर क्रमांक 59/25 कलम 299, 302, 356(1), 356(2) BNS अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अबू आझमी यांच्या वक्तव्याचा परिणाम ठाण्यातही दिसून येत आहे. अबू आझमी यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे निदर्शने करण्यात आली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लोकांनी निदर्शने केली. यावेळी अबू आझमी यांचा पुतळा जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीMaharashtraमहाराष्ट्रUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा