शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

BJP National Executive Meeting: KCR-ओवेसींच्या बालेकिल्ल्यात भाजपचं शक्तीप्रदर्शन, PM मोदी आणि CM योगीही पोहोचणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 7:42 AM

बाय बाय केसीआर, हे ध्येय वाक्य घेऊन तब्बल 18 वर्षांनंतर हैदराबादमध्ये भाजपची ही बैठक होत आहे.

देशात 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता भाजपने आपली नजर दक्षिण भारतातील राज्यांकडे वळवली आहे. येथे भाजप आपला जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून आता भाजपने कर्नाटकनंतर तेलंगणावर लक्ष केंद्रित केले आहे. याच उद्देशाने त्यांनी आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये ठेवली आहे. या बैठकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीचे (TRS) चंद्रशेखर राव आणि AIMIM चे असदुद्दीन ओवेसी यांना घेरण्याचा प्रयत्न करेल.

तेलंगानामध्ये सरकार बनवण्याच्या प्रयत्नात भाजप -बाय बाय केसीआर, हे ध्येय वाक्य घेऊन तब्बल 18 वर्षांनंतर हैदराबादमध्ये भाजपची ही बैठक होत आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे फायरब्रँड मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील सहभागी होणार आहेत. यावेळी, वेगळ्या तेलंगणा राज्याच्या निर्मितीतील भाजपच्या योगदानासंदर्भातही, या कार्यकारिणी बैठकीतून संदेश देण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. याशिवाय, वेगळ्या तेलंगणा राज्याच्या आंदोलनातील भाजपच्या समर्थनाचा आणि सुषमा स्वराज यांच्या संसदेतील ऐतिहासिक भाषणाचाही उल्लेख करेल.

जनसंपर्कासाठी पक्षाच्या नेत्यांची ड्यूटी- केसीआर हे साधारणपणे 522 दिवसांसाठीच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर सत्तापरिवर्तन होईल आणि भाजप स्वबळावर राज्यात बहुमताचे सरकार स्थापन करेल, अशी घोषणा भाजपने केली आहे. यासाठी भाजपने तयारीही सुरू केली आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू होण्यापूर्वीच, भाजपने तेलंगणातील 119 विधानसभा मतदार संघांत, कार्यकारी समितीच्या 119 वरिष्ठ आणि कनिष्ठ नेत्यांची 48 तासांसाठी ड्युटी लावली आहे. यात अनेक केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे.

पंतप्रधान मोदींची उद्या रॅली - भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर 3 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी येथील प्रसिद्ध परेड ग्राऊंडवर दुपारी ४ वाजताच्या सुमारास जनसभेला संबोधित करतील. या रॅलीसाठी पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांचे सर्व मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. रॅली यशस्वी करण्यासाठी 33 हजार बूथ समन्वयकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाTelanganaतेलंगणाyogi adityanathयोगी आदित्यनाथ