...तर क्रेनला उलटे लटकवून तुमची दाढी कापेन, भाजपा खासदाराची ओवैसींना धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 15:30 IST2020-01-04T15:11:07+5:302020-01-04T15:30:07+5:30

भाजपा आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता...

BJP MP threatens Owaisi to shave his beard by hanging the crane upside down | ...तर क्रेनला उलटे लटकवून तुमची दाढी कापेन, भाजपा खासदाराची ओवैसींना धमकी 

...तर क्रेनला उलटे लटकवून तुमची दाढी कापेन, भाजपा खासदाराची ओवैसींना धमकी 

हैदराबाद -  भाजपा खासदार धर्मापुरी अरविंद यांनी एमआयएमचे नेते असद्दुदीन ओवेसी यांना क्रेनला लटकवून दाढी कापून टाकण्याची धमकी दिली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून ओवैसींवर टीका करताना धर्मापुरी अरविंद यांनी हे विधान केले आहे.  त्यामुळे भाजपा आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.

तेलंगणामधील  निजामाबाद मतदारसंतून निवडून आलेले भाजपा खासदार धर्मापुरी अरविंद यांनी एका सभेला संबोधित करताना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध कणाऱ्या असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार टीका केली. ''मी असदुद्दीन ओवैसींना इशारा देतोय की मी तुम्हाला क्रेनला उलटे टांगून तुमची दाढी कापून टाकेन. त्यानंतर ती दाढी मुख्यमंत्र्यांना (चंद्रशेखर राव) चिटकवून तिला प्रमोशन देईन,'' असे विधान भाजपा खासदार धर्मपुरी अरविंद यांनी केले आहे.  

ओवैसी हे देशद्रोह्याप्रमाणे वर्तन करत आहेत. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची तुरुंगात रवानगी केली पाहिजे, अशी मागणी धर्मपुरी अरविंद यांनी केली आहे. ''असदुद्दीन ओवैसी हे बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेल्या लोकांसाठी लढत आहेत. ते एखाद्या देशद्रोह्याप्रमाणे वर्तन करत आहेत. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. तसेच त्यांची कायमस्वरपी तुरुंगात रवानगी केली पाहिजे.'' अशी मागणी धर्मपुरी अरविंद केली आहे. 

Web Title: BJP MP threatens Owaisi to shave his beard by hanging the crane upside down