“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 17:27 IST2025-12-10T17:23:11+5:302025-12-10T17:27:58+5:30
BJP Tejasvi Surya News: पुढील कार्यकाळात काँग्रेस देशासाठी अधिक जबाबदार विरोधी पक्षनेते निवडेल. राहुल गांधींचे मन परदेशातच अधिक रमते. ते मनाविरोधात भारतात राजकारण करत आहेत, अशी टीका भाजपाने केली आहे.

“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
BJP Tejasvi Surya News: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशन काळात भटके श्वान, वंदे मारतम्, मतचोरी या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. यातच संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना भाजपा खासदाराने राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावरून टोलेबाजी करत भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज असल्याचे म्हटले आहे.
राहुल गांधी यांचे मन परदेशात असते. राहुल गांधी जबरदस्तीने भारतात राजकारण करत आहेत. राहुल गांधी हे अनिवासी भारतीय राजकारणी आहेत. भारताला अशा विरोधी पक्षनेत्याची गरज आहे, जो भारतात राहतो, देशाची खरोखर काळजी घेतो आणि आपले काम गांभीर्याने घेतो. राहुल गांधी भारतापेक्षा परदेशात जास्त राहतात, अशी टीका भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांनी केली.
काँग्रेस देशासाठी अधिक जबाबदार विरोधी पक्षनेते निवडेल
संसदेच्या अधिवेशनादरम्यान खासदाराला सुट्टी घेणे जवळपास अशक्य असते. संसदेचे अधिवेशन सुरू असताना राहुल गांधी यांचे परदेशात जाणे, हे त्यांना त्यांच्या कामाचे किती गांभीर्य आहे, ते दर्शवते. पुढील कार्यकाळात काँग्रेस देशासाठी अधिक जबाबदार विरोधी पक्षनेते निवडेल अशी मला आशा आहे, अशी टोलेबाजी तेजस्वी सूर्या यांनी केली. राहुल गांधी १५ ते २० डिसेंबर या कालावधीत जर्मनीला भेट देणार आहेत.
दरम्यान, राहुल गांधींच्या जर्मनी भेटीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या भाजपावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा अर्धा वेळ परदेशात घालवतात, मग लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या भेटीबद्दल प्रश्न का उपस्थित केले जात आहेत, अशी विचारणा प्रियंका गांधी यांनी केली.
#WATCH | Delhi | BJP MP Tejasvi Surya says," Rahul Gandhi ji is a non-resident Indian politician. India deserves an India resident Leader of the Opposition who really cares about this country and takes their job seriously. He stays abroad more than he stays in India. His heart… pic.twitter.com/OpcMR3GeqG
— ANI (@ANI) December 10, 2025