'दिल्लीत योगी आदित्यनाथांना जागा नाही';निशिकांत दुबे यांच्या विधानामुळे भाजपमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 21:31 IST2025-07-03T21:30:14+5:302025-07-03T21:31:56+5:30

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजकीय भविष्याविषयी भाष्य केलं आहे.

BJP MP Nishikant Dubey has commented on CM Yogi Adityanath political future | 'दिल्लीत योगी आदित्यनाथांना जागा नाही';निशिकांत दुबे यांच्या विधानामुळे भाजपमध्ये खळबळ

'दिल्लीत योगी आदित्यनाथांना जागा नाही';निशिकांत दुबे यांच्या विधानामुळे भाजपमध्ये खळबळ

Nishikant Dubey on UP CM Yogi Adityanath: भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी केलेल्या विधानांना सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. एका पॉडकास्टवर बोलताना निशिकांत दुबे यांनी योगी आदित्यनाथ यांच्यासाठी दिल्लीत जागा नसल्याचे म्हटलं. निशिकांत दुबे यांनी केलेल्या विधानांनी योगी आदित्यनाथ राजकीय भविष्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत.

युट्यूबर प्रफुल्ल गर्ग यांच्या पॉडकास्टवर निशिकांत दुबे बोलत होते. त्यांना योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल काय वाटते असं विचारण्यात आलं होतं. यावर निशिकांत दुबे म्हणाले की, "योगी आदित्यनाथ आज मुख्यमंत्री आहेत. पण दिल्लीत एकही जागा रिकामी नाही. २०-२५ वर्षांनी परिस्थिती काय असेल हे कोणालाही माहिती नाही. राजकारणात २० वर्षे हा खूप मोठा काळ आहे. म्हणून, असे प्रश्न ना कोणाच्या मनात आहेत आणि ना कोणाच्या मनात असू नयेत."

२०१७ मध्ये, जेव्हा योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले, तेव्हा उत्तर प्रदेशातील लोकांनी त्यांच्या नावाने मतदान केले नाही. लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने मतदान केले. आजही लोक फक्त पंतप्रधान मोदींनाच मतदान करतात, असं दुबे म्हणाले. त्यानंतर युट्यूबरने योगी आदित्यनाथ लोकांच्या पसंतीस उतरत असल्याचे म्हटलं. त्यावर दुबे यांनी, "अनेक लोक आवडत आहेत. हिमंता बिस्वा शर्मा हेसुद्धा आवडतात. देवेंद्र फडणवीस हेसुद्धा आवडत आहे," असं म्हटलं.

"गृहमंत्र्यांवर किती प्रेम आहे हे अकल्पनीय आहे. अमित शहा यांनी कलम ३७०, कलम ३५अ आणि नक्षलवाद संपवला. भारतीय जनता पक्ष इतका मोठा राजकीय पक्ष बनला आहे. तो ११ कोटी लोकांचा राजकीय पक्ष बनला आहे. याचे सर्व श्रेय त्या काळातील आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांना जाते," असंही निशिकांत दुबे म्हणाले.

दरम्यान, निशिकांत दुबे यांना योगींच्या सध्याच्या राजकीय चर्चेबद्दल विचारण्यात आलं होतं. मात्र त्यांनी भविष्याबद्दल उत्तर दिलं. यातून त्यांनी उत्तर प्रदेशच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांचे भविष्य अनिश्चित असल्याचे सांगून टाकलं.

Web Title: BJP MP Nishikant Dubey has commented on CM Yogi Adityanath political future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.