शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा खासदाराच्या कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू; अन्य महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 05:40 IST

भाजपाचे राज्यसभा सदस्य व प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिंहा राव यांच्या कारने आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात दोन महिलांना धडक दिली

गुंटूर : भाजपाचे राज्यसभा सदस्य व प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिंहा राव यांच्या कारने आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात दोन महिलांना धडक दिली. त्यापैकी एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला जखमी झाली असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर संतप्त स्थानिक लोक रस्त्यावर जमताच, खा. नरसिंहा राव तेथून घाईघाईने निघून गेले.

कारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. अपघात झाला, तेव्हा आपण झोपलो होतो, असे खा. राव म्हणाले. मात्र अपघातानंतर ते निघून गेल्याने सोशल मीडियातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अपघात होताच, दोघा महिलांचे कुटुंबीय व गावकरी रस्त्यावर आले. हा संतप्त जमाव पाहून खा. राव अन्य कारमधून निघून गेले. ते म्हणाले की, अपघात झाला, तेव्हा मी मागच्या सीटवर झोपलो होतो. पोलीस येईपर्यंत व महिलांना रुग्णालयात नेईपर्यंत मी थांबलो होतो. आपण निघून गेलो, असे म्हणणे चुकीचे आहे. दोन्ही कुटुंबांची आपण लवकरच भेट घेणार आहोत. (वृत्तसंस्था)विमान प्रवासावर निर्बंधया अपघातानंतर खा. राव लगेच निघून गेल्याबद्दल गावकरी तर संतापले आहेतच, पण सोशल मीडियातूनही त्यांच्यावर सतत टीका होत आहे. जखमींना मदत करण्याऐवजी खासदार महोदयांनी निघून जाण्याचा प्रकार निंदनीय व दुर्दैवी आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातBJPभाजपाDeathमृत्यूWomenमहिला