शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आमदाराच्या फॉर्च्युनरला वळूची जोरदार धडक, गाडीचा चेंदामेंदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 12:58 IST

गाडीचा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी आमदार आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना गाडीतून बाहेर काढले.

बस्ती - उत्तर प्रदेशीतील भाजप आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून एका जनावरांनी त्यांच्या गाडीला धडक दिली. देवरिया जिल्ह्यातील रुद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. बस्ती जिल्ह्यातील छावनी क्षेत्रात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २८ वर ही दुर्घटना घडली. आमदार जय प्रकाश निषाद असे त्यांचे नाव असून त्यांची गाडी रस्त्यावरुन जात असलेल्या मोकाट बैलांच्या कळपाला धडकली होती. सुदैवाने या दुर्घटनेत ते थोडक्यात बचावले. त्यांना किरकोळ जखम झाली असून गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. 

गाडीचा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी आमदार आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर, आमदार महोदयांना एका खाटेवर बसवून आराम करायला लावला. काही वेळानंतर दुसऱ्या गाडीतून ते लखनौसाठी रवाना झाले. एनएच 28 महामार्गावर खतमसराय गावाजवळून आमदार जय प्रताप हे गोरखपुरहून लखनौसाठी जात होते. माजी मंत्री आणि देवरिया जनपद च्या रुद्रपुर मतदारसंघाचे आमदार जयप्रकाश निषाद यांच्या फॉर्च्युनर गाडीसमोर मोकाट जनावरांचा कळप आल्याने ही कार हायवेवरच पलटी झाली. पलटी होऊन ही गाडी दूरवर फेकली गेली. आमदार महोदयांच्या गाडीला झालेला अपघात पाहून मोठ्या प्रमाणात स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. 

या फॉर्च्यूनर कारमधून ७ जण प्रवास करत होते, स्थानिकांनी सर्वांनाच प्रयत्नांची पराकाष्टा करुन बाहेर काढले. या दुर्घटनेत जय प्रकाश निषाद जखमी झाले आहेत. तर, सुरक्षा रक्षक कॉन्स्टेहबल ओम नरेश सिंह आणि कॉन्स्टेबल चंदन निषाद हेही जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना दुसऱ्या कारमधून इच्छित स्थळी रवाना केले. 

टॅग्स :AccidentअपघातBJPभाजपाMLAआमदारUttar Pradeshउत्तर प्रदेश