शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराचा आरोप असलेले भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर यांच्या भावास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 09:56 IST

बलात्काराच्या आरोप झालेले भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर यांच्या भावाला पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली. कुलदीप सिंग सेनगर यांनी आपल्यावर बलात्ताक केल्याचा आरोप एका तरुणीने केला होता. त्यातच पीडित तरुणीच्या वडिलांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने या प्रकरणावरून वातावरण तापले होते.

लखनौ - बलात्काराच्या आरोप झालेले भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर यांचा भाऊ अतुल सिंह याला पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली. कुलदीप सिंग सेनगर यांनी आपल्यावर बलात्ताक केल्याचा आरोप एका तरुणीने केला होता. त्यातच पीडित तरुणीच्या वडिलांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने या प्रकरणावरून वातावरण तापले होते. या प्रकरणी सरकारने तातडीने कारवाई करत सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. तसेच 4 जणांना अटक केली होती. दरम्यान, आपल्या वडलांना मारहाण झाल्याचा आरोप पीडित तरुणीने केला होता.   उत्तर प्रदेशमधील भाजपाचे आमदार कुलदीपसिंग सेनगर यांनी बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या युवतीच्या वडिलांना पोलिसांनी रविवारी अटक केली होती. पोलीस कोठडीत असताना त्यांच्या पोटात दुखायला लागले व उलटीही झाली. त्यामुळे रविवारी रात्री त्यांना पोलिसांनी उन्नाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांचा मृत्यू झाला.  दरम्यान, या प्रकरणात कुलदीप सिंह यांचा भाऊ अतुल सिंह याला क्राइम ब्रँच ने अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे. मात्र पीडित महिलेने कुलदीप सिंह यांच्या अटकेची मागणी केली आहे.  वडिलांच्या मृत्यूमुळे आता या सर्व प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. त्यांना कोठडीत पोलिसांनी बेदम मारहाण असल्याचा संशय आहे. ज्या आमदारावर बलात्काराचा आरोप आहे, त्याच्या भावाच्या सांगण्यावरून पोलिसांनी वडिलांना मारहाण केली, असा नातेवाइकांचा आरोप  केला होता सेनेगर यांनी बलात्कार केल्याचा आरोप करणा-या युवती व तिच्या घरातील काही महिलांनी रविवारी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा केलेला प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला होता. त्या वेळी तिच्या कुटुंबातील काही मंडळींनीही निदर्शने केली होती. या सर्वांना पोलिसांनी अटक केली होती. सेनगर यांना मात्र हे आरोप मान्य नाहीत. आपल्या राजकीय विरोधकांनी रचलेले हे कारस्थान आहे, असा त्यांचा दावा आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटकBJPभाजपाMLAआमदार