"गांधी कुटुंबाने माझ्याविरोधात निवडणूक लढवून ३ लाख मतं मिळवावीत, मी राजकारणातून संन्यास घेईन"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 13:19 IST2024-10-19T13:17:49+5:302024-10-19T13:19:30+5:30
Dinesh Pratap Singh: संपूर्ण गांधी कुटुंबाला 'पलायनवादी' असं म्हणत खुले आव्हानही दिनेश प्रताप सिंह यांनी दिले आहे.

"गांधी कुटुंबाने माझ्याविरोधात निवडणूक लढवून ३ लाख मतं मिळवावीत, मी राजकारणातून संन्यास घेईन"
Dinesh Pratap Singh:काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वायनाडमधून लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार आहेत. त्यांची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. यावरून उत्तर प्रदेश सरकारचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) दिनेश प्रताप सिंह यांनी प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, संपूर्ण गांधी कुटुंबाला 'पलायनवादी' असं म्हणत खुले आव्हानही दिनेश प्रताप सिंह यांनी दिले आहे.
"मी या सर्व गांधींना रायबरेलीमध्ये आमंत्रित करतो, जेव्हा त्यांना वाटेल, तेव्हा पंजाचे चिन्ह घेऊन काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून माझ्याविरोधात निवडणूक लढवावी आणि तीन लाख मते मिळवावी. मी राजकारणातून संन्यास घेईन", असे दिनेश सिंह यांनी एका खुल्या पत्राद्वारे गांधी कुटुंबाला आव्हान दिले आहे.
राज्यमंत्र्यांनी गुरुवारी एक पत्र जारी करून म्हटले आहे की, माझ्यासाठी भारतीय संस्कार आणि संस्कृती असलेली भारतातील प्रत्येक महिला माता भगवती सारखी आहे, परंतु मी प्रियांका गांधी यांचे राहणीमान, आचरण, खाण्याच्या सवयी वगैरे मला भारतीय संस्कृतीला अनुसरून वाटत नाहीत. तसेच,
प्रियांका गांधी या केवळ पराभवाच्या भीतीने रायबरेलीतून निवडणूक लढवत नाहीत. हे जरी खरे असले तरी, त्या केवळ वायनाडमधूनच निवडणूक का लढवणार आहेत? कोणाला होणारा विरोध त्यांना वायनाडला घेऊन जात आहे, हे काचेप्रमाणे स्पष्ट आहे. त्यामुळे असा सवाल उपस्थित होत आहे.
याचबरोबर, 'गांधी' कुटुंब पलायनवादी आहेत, हे खरं आहे. जोपर्यंत सोनिया गांधींना अमेठी आणि रायबरेलीतून अन्नधान्याचा पुरवठा होत होता, तोपर्यंत त्या अमेठी आणि रायबरेलीतच राहिल्या, जेव्हा त्यांना पराभव दिसून येत होता, तेव्हा त्या राजस्थानला पळून गेल्या. तसेच, राहुल गांधी आधी अमेठी सोडून वायनाडल गेले, त्यानंतर त्यांनी रायबरेलीसाठी वायनाड सोडले आणि आता प्रियांका गांधी आपले घर, सासर, रायबरेली, अमेठी सोडून वायनाडला जात आहेत. त्याचप्रमाणे हरल्यानंतर इंदिरा गांधीही रायबरेली सोडून मेडकला (आंध्र प्रदेश) गेल्या होत्या, त्यामुळे असा सवाल उपस्थित होत आहे, असे दिनेश प्रताप सिंह यांनी म्हटले आहे.