BJP Meeting: 'मिशन 2024 वर काम सुरू करा', भाजपाध्यक्ष जेपी नड्डांचे सर्व पदाधिकाऱ्यांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 20:36 IST2022-12-06T20:35:16+5:302022-12-06T20:36:06+5:30
BJP Meeting: राजधानी दिल्लीत झालेल्या भाजपच्या दोन दिवसीय बैठकीत पदाधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश देण्यात आले.

BJP Meeting: 'मिशन 2024 वर काम सुरू करा', भाजपाध्यक्ष जेपी नड्डांचे सर्व पदाधिकाऱ्यांना निर्देश
BJP Meeting: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राजधानी दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. सोमवारी राष्ट्रीय भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बैठकीचे उद्घाटन करण्यात आले. या बैठकीत नड्डा यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना 2024च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देश दिले. या महत्त्वपूर्ण बैठकीत भाजपच्या प्रमुख नेत्यांनी पुढील टप्प्यातील राज्य निवडणुका तसेच 2024 मधील लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीचा आणि रणनीतीचा आढावा घेतला.
केंद्रीय नेतृत्वाने नेमून दिलेली कामे पूर्ण करण्याबरोबरच राज्यातील संघटन आणि बूथ-स्तरीय केडर मजबूत करण्यावर भर देण्यास सांगितले आहे. ज्या 144 लोकसभा जागा भाजप आतापर्यंत जिंकू शकला नाही, त्या जिंकण्यासाठीही बैठकीत चर्चा झाली. बूथ आणि मंडल स्तरावर आपल्या कार्यकर्त्यांना बळ देऊन, भाजपला लोकसभेच्या ज्या जागा 5000 पेक्षा कमी मतांच्या फरकाने पराभूत झाल्या, त्या जिंकण्याची आशा आहे.
बैठकीत प्रामुख्याने संघटनात्मक कामांबाबत चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होऊ नयेत, याची खात्री कोण कुठे आणि कशी करत आहे, यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षश्रेष्ठींना इतर पक्षांतील उमेदवारांना संघटनात्मक भूमिकेत सामावून घेण्यास प्रोत्साहन देण्यात आले. पीएम मोदींनी सोमवारी संबोधित केलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपचे प्रदेश प्रमुख, सरचिटणीस आणि इतर पदाधिकारीही सहभागी झाले होते.