शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
2
रुपयाची ऐतिहासिक घसरण! डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ९० च्या खाली, तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?
3
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
4
किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर
5
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
6
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
7
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
8
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
9
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
10
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
11
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
12
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
13
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
14
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
15
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
16
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
17
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
18
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
19
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
20
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
Daily Top 2Weekly Top 5

भाजप वादग्रस्त विधेयके ठेवू शकते थंडबस्त्यात, संसद अधिवेशनात 'सहमती' हा नवीन मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 06:52 IST

NDA Government : भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील एनडीए सरकार मतदारसंघांची फेररचना, एक देश एक निवडणूक आदी सर्व वादग्रस्त विधेयके (Controversial Bills) या अधिवेशनात बाजूला ठेवण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणे आणि काही विधेयके मंजूर करुन घेणे याला सरकार प्राधान्य देणार आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली -  भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार मतदारसंघांची फेररचना, एक देश एक निवडणूक आदी सर्व वादग्रस्त विधेयके या अधिवेशनात बाजूला ठेवण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणे आणि काही विधेयके मंजूर करुन घेणे याला सरकार प्राधान्य देणार आहे. भाजपला आपल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन चालायचे आहे आणि विरोधकांसोबतही सकारात्मक राहायचे आहे. संसदीय कामकाज मंत्रालयात प्रल्हाद जोशी यांच्यासोबत मृदुभाषी किरण रिजिजू यांची नियुक्ती हेच दर्शविते की, सरकार एकमत बनवू इच्छित आहे.

यावेळी संसदेत ही विधेयके मांडण्यापेक्षा महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंडमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुका जिंकण्यावर पंतप्रधान मोदींचे मुख्य लक्ष असेल. भाजप आपल्या मित्रपक्षांसह एक अनौपचारिक समन्वय समिती स्थापन करू शकते. भाजपला अनेक शक्तिशाली संसदीय समित्यांचे सदस्यत्व आपल्या मित्रपक्षांना द्यावे लागणार आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपकडे स्वतःचे बहुमत असल्याने त्यांनी कधीही समितीची पर्वा केली नाही आणि एनडीएचे अस्तित्व कागदावरच राहिले. 

हे विषय बाजूला एनडीए सरकारचे महत्त्वाकांक्षी विषय जसे की, समान नागरी कायदा, एनआरसी, लोकसभा मतदारसंघांचे परिसीमन आणि एक देश, एक निवडणूक हे १८ व्या लोकसभेची रचना लक्षात घेता बाजूला ठेवावे लागतील. प्रलंबित वीज दुरुस्ती विधेयकाबाबत सरकारने सर्व संबंधितांशी चर्चा करावी, असे जदयूने आधीच सुचवले आहे.

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी