शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

2018 भाजपासाठी धोक्याचं? तीन राज्यांमधील सत्ता संपुष्टात; दोन राज्यं संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 10:57 IST

सध्या 19 राज्यांमध्ये भाजपाची सत्ता

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये तीन वर्ष दोन महिने आणि अठरा दिवस सत्ता संचलन केल्यावर भाजपानं पीडीपीची साथ सोडली. भाजपाला सत्ता सोडावं लागलेलं 2018 मधील हे तिसरं राज्य ठरलं आहे. तर आणखी दोन राज्यांमधील भाजपाची सत्ता धोक्यात आहे. त्यामुळे यंदाचं वर्ष भाजपासाठी सत्ता संचलनाच्या दृष्टीनं फारसं चांगलं ठरताना दिसत नाही. मार्च महिन्यात आंध्र प्रदेशच्या सत्तेतील वाटा भाजपाला सोडावा लागला. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीकडे मोदी सरकारनं दुर्लक्ष केलं. त्यामुळे आंध्र प्रदेशातील सत्ताधारी टीडीपीनं एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यामुळे भाजपाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला. यानंतर गेल्याच महिन्यात कर्नाटकमध्ये भाजपाला धक्का बसला. कर्नाटकमध्ये भाजपानं सर्वाधिक जागा जिंकल्या. यानंतर येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मात्र भाजपाला बहुमत सिद्ध करता आलं नाही. त्यामुळे येडियुरप्पा यांनी राजीनामा द्यावा लागला. काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देणाऱ्या भाजपाला अनेक राज्यांमधील पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. सध्या 19 राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. यातील 15 राज्यांमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. तर चार राज्यांमध्ये भाजपाच्या मित्रपक्षांकडे मुख्यमंत्रीपद आहे. गेल्याच वर्षी संयुक्त जनता दल एनडीएमध्ये सहभागी आल्यानं बिहारमध्ये भाजपा सत्ताधारी झाला. मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सध्याची विधानं पाहता त्यांची भाजपासोबतची सोयरिक किती दिवस टिकणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या वर्षाच्या अखेरीस चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोरमचा समावेश आहे. यातील राजस्थान आणि मध्य प्रदेशातील भाजपाची सत्ता धोक्यात आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाला काँग्रेसचा सामना करावा लागणार आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि पक्षाचं संघटन यांच्यात सगळं आलबेल नाही. तर मध्य प्रदेशात सत्ताविरोधी वातावरणाचा फटका मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानाला बसू शकतो. मध्य प्रदेशात शेतकऱ्यांचं आंदोलनदेखील जोरात आहे. मात्र छत्तीसगडमधील परिस्थिती भाजपासाठी अनुकूल आहे.  

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरKarnatakकर्नाटकAndhra Pradeshआंध्र प्रदेशMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthanराजस्थान