शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

उमा भारती करणार कुटुंबाचा त्याग, 'दीदी माँ' नावाने ओळखल्या जाणार; यामुळे घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 13:46 IST

मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या उमा भारती यांनी कुटुंबाचा त्याग करण्याची घोषणा केली आहे.

भोपाळ:मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या उमा भारती (Uma Bharti) यांनी कुटुंबाचा त्याग करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी भारती यांनी जाहीर केले की, जैन संत आचार्य विद्यासागर महाराज यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी त्या आपल्या कुटुंबाचा त्याग करत आहेत. तसेच, त्या आता 'दीदी माँ' या नावाने ओळखल्या जाणार आहेत.

येत्या 17 नोव्हेंबर रोजी त्या गुरूच्या परवानगीने कुटुंबातील सदस्यांशी असलेले सर्व संबंध संपवणार आहेत. सलग 14 ट्विट करत उमा भारती यांनी ही घोषणा केली. आपल्या ट्विटमध्ये उमा भारती यांनी निवृत्तीचे संपूर्ण स्पष्टीकरण तर दिले आहेच, पण त्यांना फक्त 'दीदी माँ' या नावानेच का संबोधले जाईल हे देखील सांगितले आहे.

30 वर्षांपूर्वी घेतला होता संन्यास17 नोव्हेंबर 1992 रोजी त्यांनी अमरकंटकमध्ये 'संन्यास' घेतला होता, तेव्हा त्यांचे नाव उमा ऐवजी उमाश्री भारती करण्यात आले होते. या गोष्टीला 17 नोव्हेंबर 2022 रोजी 30 वर्षे होतील. उमा भारती म्हणाल्या की, गुरु विद्यासागर जी महाराज यांच्या सल्ल्यानुसार 30 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 17 नोव्हेंबरपासून त्या 'दीदी माँ' म्हणून ओळखल्या जातील. 

'आता तुम्हीच माझे कुटुंब आहात'उमा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, 'ज्या कुटुंबात माझा जन्म झाला...माझ्या राजकीय प्रवासात माझ्या भावांनी आणि पुतण्यांनी मला खूप साथ दिली. किंबहुना त्यांनी आपला जीव पणाला लावला, अनेक समस्यांना तोंड दिले. आता सर्वजण आपापल्या परीने प्रगती करत आहेत, मुली मोठ्या कॉलेजमध्ये आहेत. सून पायलट आहे, डॉक्टर आहे, वकील आहे…. हे कुटुंब माझे संपूर्ण जग आहे. पण आता एका कुटुंबाऐवजी तुम्ही सर्व माझे कुटुंब आहात… आता माझे कुटुंब देखील माझ्यापासून मुक्त आहे आणि मी देखील माझ्या कुटुंबापासून मुक्त होणार आहे.' 

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश