शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

विजयाच्या उन्मादात भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारानं बाल्कनीतून उडवले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2018 4:48 PM

ईशान्य भारतातल्या नागालँड राज्यात भाजपानं मिळवलेल्या यशानंतर नेत्यांनी जल्लोष केला आहे. या जल्लोषाच्या उन्मादात भाजपाच्या एका नवनिर्वाचित आमदारानं चक्क बाल्कनीतून खाली पैसे फेकले आहेत.

कोहिमा- ईशान्य भारतातल्या नागालँड राज्यात भाजपानं मिळवलेल्या यशानंतर नेत्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. या जल्लोषाच्या उन्मादात भाजपाच्या एका नवनिर्वाचित आमदारानं चक्क बाल्कनीतून पैसे उडवले आहेत. त्यानंतर फेकलेले पैसे उचलण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली, या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ही घटना नागालँडमधल्या जुन्हेबोटो जिल्ह्यातील सुरुहोटो विधानसभा क्षेत्रातील आहे.भाजपाच्या 19 जागा निवडून आल्यानंतर भाजपा आमदार एच. खेहोवी यांनी स्वतःच्या बाल्कनीतून नोटा फेकल्याची घटना घडली आहे. एच. खेहोवी यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि ती जिंकलीसुद्धा. 52 वर्षांचे खेहोवी भरपूर श्रीमंत आहेत. ते पहिले सरकारी कर्मचाही होते. निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि त्यानंतर ते राजकारणात आले. ते आता सुरुहोटो विधानसभा क्षेत्रातील आमदार आहेत. 3 मार्च रोजी लागलेल्या निकालानंतर नागालँडमध्ये भाजपा आघाडी सरकार बनवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपानं इथे स्वतःची सहयोगी पार्टी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी(NDPP)बरोबर सत्ता स्थापन करणार आहे. नागालँडमध्ये भाजपा आणि एनडीपीपी आघाडीनं 29 जागांवर विजय मिळवला आहे.तर एका जागेवर निवडून आलेले जेडीयूचे आमदार आणि एक अपक्ष आमदार हेसुद्धा भाजपा आघाडीला समर्थन देणार आहेत. नागालँड पीपल्स फ्रंट(एनपीएफ)ने 27 आणि इतर तीन जागांवर विजय मिळवला आहे. राज्यातील निवडणुकांचा निकाल पाहता राजकीय समीकरणं जुळवाजुळवीला वेग आला आहे. नागालँडमधील 60 सदस्यीय विधानसभेत रियो यांच्या एनडीपीपीला 18, तर सहकारी पक्ष भाजपला 12 जागा मिळाल्या आहेत.

टॅग्स :Nagaland Election Results 2018नागालँड निवडणूक निकाल 2018BJPभाजपा