बलात्काराचा आरोप असलेले भाजपा नेते स्वामी चिन्मयानंद यांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 10:23 AM2019-09-20T10:23:59+5:302019-09-20T10:34:53+5:30

बलात्काराचा आरोप झालेले भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना आज अटक करण्यात आली.

BJP leader Swami Chinmayanand has been arrested in connection with the alleged sexual harassment of a law student | बलात्काराचा आरोप असलेले भाजपा नेते स्वामी चिन्मयानंद यांना अटक 

बलात्काराचा आरोप असलेले भाजपा नेते स्वामी चिन्मयानंद यांना अटक 

Next

लखनौ - बलात्काराचा आरोप झालेले भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना आज अटक करण्यात आली. एसआयटी आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी शाहजहाँपूर येथे चिन्मयानंद यांच्याविरोधात ही अटकेची कारवाई केली. चिन्मयानंद यांच्याविरोधातील प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. 



विधि महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने भाजप नेते चिन्मयानंद यांच्यावर केलेल्या छळाच्या आरोपांचा तपास करण्यासाठी आयजी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिले होते. 



चिन्मयानंद यांच्यावर छळाचे आरोप करून बेपत्ता झालेल्या एका २३ वर्षीय तरुणीसोबत ही व्यक्ती राजस्थानात सापडली होती.विधि महाविद्यालयाची विद्यार्थिनी असणाºया या तरुणीने सोशल मीडियात एक व्हिडिओ पोस्ट करून भाजपच्या या नेत्यावर असा आरोप केला होता की, त्यांनी अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.  

Web Title: BJP leader Swami Chinmayanand has been arrested in connection with the alleged sexual harassment of a law student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.