Sonali Phogat: भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचं अकाली निधन, टिकटॉक स्टार म्हणूनही होत्या प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 10:41 IST2022-08-23T10:40:03+5:302022-08-23T10:41:19+5:30
Sonali Phogat: भाजपाच्या हरयाणामधील फायरब्रँड नेत्या सोनाली फोगाट यांचं निधन झालं आहे. सोनाली फोगाट यांचं गोव्यामध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.

Sonali Phogat: भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचं अकाली निधन, टिकटॉक स्टार म्हणूनही होत्या प्रसिद्ध
पणजी - भाजपाच्याहरयाणामधील फायरब्रँड नेत्या सोनाली फोगाट यांचं निधन झालं आहे. सोनाली फोगाट यांचं गोव्यामध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. टिकटॉक स्टार राहिलेल्या सोनाली फोगाट यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. तसेच कुलदीप बिश्नोई यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.
सोनाली फोगाट यांनी सुरुवातीच्या काळात अँकरिंग, तसेच मॉडेलिंग करत कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्या टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या. दरम्यान, २०१९ मध्ये भाजपात प्रवेश करून कुलदीप बिश्नोई यांना आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळातही त्यांची चर्चा सुरू झाली होती.
भाजपाने त्यांच्याकडे आदिवासी भागात काम करण्याची जबाबदारी सोपवली होती. दरम्यान, आज गोव्यामध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं.