शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

JNU Protest : दीपिका पादुकोण भारताचे तुकडे करण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांसोबत; स्मृती इराणींचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 1:28 PM

JNU Protest : दीपिका पादुकोणच्या जेएनयू भेटीवर स्मृती इराणींचं टीकास्त्र

नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतलेल्या अभिनेत्री दीपिका पादुकोणवर केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणींनी टीका केली आहे. दीपिका राजकीयदृष्ट्या कोणाशी संबंधित आहे, हे मला जाणून घ्यायचं आहे, असं इराणी एका कार्यक्रमात म्हणाल्या. ज्यांनी दीपिकाच्या जेएनयू भेटीची बातमी वाचली, त्यांना दीपिका आंदोलकांना भेटण्यासाठी का गेली हा प्रश्न पडला आहे, असं इराणी म्हणाल्या. JNU Protest : जेएनयूत जाण्यापेक्षा दीपिकानं मुंबईत जाऊन नाचावं; भाजपा नेता बरळलाभारताचे तुकडे करू पाहणाऱ्यांसोबत, तरुणींच्या गुप्तांगावर काठीनं हल्ला करणाऱ्यांसोबत दीपिका उभी होती, याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत नाही, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं. जेएनयूतील विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जेएनयू कॅम्पसमध्ये गेलेल्या दीपिकावर इराणींनी एका कार्यक्रमात भाष्य केलं. या कार्यक्रमाचा व्हिडीओ भाजपा नेते तेजिंदर पाल बग्गांनी ट्विट केला आहे.  दीपिकानं जेएनयूतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचं मला आश्चर्य वाटत नाही, असं इराणी म्हणाल्या. त्यांनी यामागचं कारणदेखील उपस्थितांना सांगितलं. दीपिका काँग्रेसशी संबंधित असल्याचा अप्रत्यक्ष दावा त्यांनी केला. आपण काँग्रेसचं समर्थन करत असल्याचं २०११ मध्ये दीपिकानं म्हटलं होतं. अनेकांना या गोष्टीची कल्पना नाही. त्यामुळेच मला दीपिकाच्या जेएनयू भेटीचं आश्चर्य वाटतं नाही, असं इराणी म्हणाल्या.  भाजपा नेता म्हणतो, दीपिका तुकडे-तुकडे गँगची समर्थक; तिच्या चित्रपटांवर बहिष्कार घालायावेळी स्मृती इराणींना जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असल्याचं उत्तर त्यांनी दिलं. 'या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मी घटनात्मक पदावर आहे. त्यामुळे पोलीस तपास सुरू असताना आणि या तपासाची माहिती न्यायालयासमोर मांडली गेली नसताना यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही,' असं इराणींनी सांगितलं. 

टॅग्स :jnu attackजेएनयूDeepika Padukoneदीपिका पादुकोणSmriti Iraniस्मृती इराणी