नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतलेल्या अभिनेत्री दीपिका पादुकोणवर केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणींनी टीका केली आहे. दीपिका राजकीयदृष्ट्या कोणाशी संबंधित आहे, हे मला जाणून घ्यायचं आहे, असं इराणी एका कार्यक्रमात म्हणाल्या. ज्यांनी दीपिकाच्या जेएनयू भेटीची बातमी वाचली, त्यांना दीपिका आंदोलकांना भेटण्यासाठी का गेली हा प्रश्न पडला आहे, असं इराणी म्हणाल्या. JNU Protest : जेएनयूत जाण्यापेक्षा दीपिकानं मुंबईत जाऊन नाचावं; भाजपा नेता बरळलाभारताचे तुकडे करू पाहणाऱ्यांसोबत, तरुणींच्या गुप्तांगावर काठीनं हल्ला करणाऱ्यांसोबत दीपिका उभी होती, याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत नाही, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं. जेएनयूतील विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जेएनयू कॅम्पसमध्ये गेलेल्या दीपिकावर इराणींनी एका कार्यक्रमात भाष्य केलं. या कार्यक्रमाचा व्हिडीओ भाजपा नेते तेजिंदर पाल बग्गांनी ट्विट केला आहे.
JNU Protest : दीपिका पादुकोण भारताचे तुकडे करण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांसोबत; स्मृती इराणींचं टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 13:56 IST