शमीनं 'रोजा' धरला नाही, इस्लामचा हवाला देत मौलाना म्हणाले 'गुन्हेगार'; माधवी लता म्हणाल्या - अल्लाह देखील खुश होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 17:26 IST2025-03-06T17:24:37+5:302025-03-06T17:26:06+5:30

Mohammed Shami Roza Controversy : माधवी लता म्हणाल्या, "माझा मौलाना साहेबांना प्रश्न आहे की, ते (शमी) एक क्रिकेटर आहेत आणि मैदानावर भारताला विजय मिळवून देण्यासाठी स्वतःला तयार ठेवणे, ही त्यांची जबाबदारी आहे. जर देशाप्रति कुणी आपले कर्तव्य पार पाडत असेल, तर मौलानांचा त्यावर आक्षेप का?

BJP leader madhavi latha commented on cricketer mohammed shami roza controversy | शमीनं 'रोजा' धरला नाही, इस्लामचा हवाला देत मौलाना म्हणाले 'गुन्हेगार'; माधवी लता म्हणाल्या - अल्लाह देखील खुश होतील

शमीनं 'रोजा' धरला नाही, इस्लामचा हवाला देत मौलाना म्हणाले 'गुन्हेगार'; माधवी लता म्हणाल्या - अल्लाह देखील खुश होतील

भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीसंदर्भात बरेली येथील मौलाना शहाबुद्दीन यांनी केलेल्या एका विधानावरून वाद निर्माण झाला आहे. मोहम्मद शमीने सामन्यादरम्यान रोजा न धरून चूक केल्याचे मौलाना शहाबुद्दीन यांनी म्हटले आहे. यानंतर आता, यासंदर्भात हैदराबाद येथील भाजपच्या फायरब्रँड नेत्या तथा ओवेसी यांच्या विरोधात निवडणूक लढलेल्या नेत्या माधवी लता यांची प्रतिक्रिया आली आहे.

माधवी लता म्हणाल्या, "माझा मौलाना साहेबांना प्रश्न आहे की, ते (शमी) एक क्रिकेटर आहेत आणि मैदानावर भारताला विजय मिळवून देण्यासाठी स्वतःला तयार ठेवणे, ही त्यांची जबाबदारी आहे. जर देशाप्रति कुणी आपले कर्तव्य पार पाडत असेल, तर मौलानांचा त्यावर आक्षेप का? मला वाटते, तो देशासाठी खेळत असल्याचे पाहून अल्लाह देखील खुश होतील." एवढेच नाही, तर मौलानांवर निशाणा साधताना माधवी लता म्हणाल्या, की स्वतः क्रिकेट का बघत होते. कारण, रमजान सुरू असताना त्यांनी एंटरटेनमेंटपासून दूर रहायला हवे."

माधवी लता मौलानावर भडकल्या - 
माधवी लता म्हणाल्या, "मी तर म्हणेन की, धर्म ही एक वैयक्तिक बाब आहे. जर मौलाना म्हणाले असते की, भारतासाठी खेळताना एका क्रिकेटरने एवढे काम केले आहे. तर आम्हाला आनंद वाटला असता."

काय म्हणाले होते मौलाना? -
बरेलीचे मौलाना शहाबुद्दीन रिझवी शमी संदर्भात बोलताना म्हणाले, रोजा न धरून शमीने मोठा गुन्हा  केला आहे. इस्लाममध्ये रोजा धरणे हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे. यामुळे शरियतनुसार शमी गुन्हेगार ठरतो, अशा आशयाचे वक्तव्य करत संबंधित मौलाना यांनी शमीवर निशाणा साधला आहे. मोहम्मद शमीच्या ज्या फोटोवरून या वादाला सुरुवात झालीये तो फोटो भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल मॅच वेळचा आहे. या सामन्यात मोहम्मद शमीनं टीम इंडियाकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

Web Title: BJP leader madhavi latha commented on cricketer mohammed shami roza controversy