Pathaan Movie 'तुझ्या मुलीसोबत पठाण पाहून दाखव'; भाजप नेत्याचे शाहरुख खानला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 16:21 IST2022-12-18T16:18:49+5:302022-12-18T16:21:25+5:30
शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्याचा वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. या वादावर राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत.

Pathaan Movie 'तुझ्या मुलीसोबत पठाण पाहून दाखव'; भाजप नेत्याचे शाहरुख खानला आव्हान
Pathaan Movie : शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्याचा वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. या वादावर राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यानंतर आता मध्य प्रदेशचे भाजप नेते गिरीश गौतम यांनीही पठाण ला विरोध करत शाहरुखला एक आव्हान दिले आहे. शाहरुखने त्याच्या मुलीसोबत चित्रपट पाहून दाखवावा असे आव्हान गिरीश गौतम यांनी केले आहे.
गिरीश गौतम म्हणाले, ' मी नरोत्तम मिश्रा यांचे समर्थन करतो. एकाच धर्माला का लक्ष केलं जात आहे.हिंमत असेल तर पैगंबरांवर सिनेमा बनवून त्यात हिरव्या रंगाचे कपडे वापरुन दाखवा. मग तर देशभरात दंगल होईल. जेव्हा हिजाबचा प्रश्न आला तेव्हा हेच लोक इराणचा विषय आहे म्हणत बोलणं टाळत होते. आमच्यासाठी सिनेमा बनवता ना मग तुझ्या मुलीसोबत सिनेमा बघून दाखव. २३-२४ वर्षांची आहे ना मुलगी तिच्यासोबत बसून बघ. आणि सांग मी माझ्या मुलीसोबत फिल्म बघत आहे. भगवा हे हिंदू धर्माच्या गौरवाचे चिन्ह आहे. तोच रंग बेशरम का ?'
पठाण २५ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. ४ वर्षांनंतर शाहरुख खानला सिनेमात बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच माझ्यासारखे जे सकारात्मक लोक आहेत ते जीवंत आहेत असं एक वक्तव्य नुकतंच शाहरुखने या सगळ्या वादावर केलं. आता २५ जानेवारी ला पठाण प्रदर्शित झाल्यावर काय परिणाम होतात हे बघता येईल.