शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! स्टिकरमध्ये भगवान शिवशंकरांच्या हातात दाखवला वाईनचा ग्लास; इन्स्टाग्रामविरोधात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 10:37 IST

भगवान शिवशंकरांच्या एका हातात वाईनचा ग्लास आणि दुसऱ्या हातात फोन दाखविण्यात आला आहे, असे मनीष सिंह यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

ठळक मुद्देराजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने इंस्टाग्रामविरोधात तक्रार दाखल केली आहे. इंस्टाग्रामवर भगवान शिवशंकरांचा अपमान केला गेला, असा आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी गुगलवर देशातील सर्वात खराब भाषा (Ugliest language in India) असे सर्च केल्यानंतर कन्नड भाषेचे नाव येत होते.

नवी दिल्ली - सध्या भारतात सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवरून मोठा वाद सुरू आहे. यातच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने इंस्टाग्रामविरोधात तक्रार दाखल केली आहे. यात, इंस्टाग्रामवर भगवान शिवशंकरांचा अपमान केला गेला, असा आरोप करण्यात आला आहे. 

भाजप नेते मनीष सिंह यांनी दिल्लीच्या पार्लमेंट स्ट्रिट पोलीस ठाण्यात इंस्टाग्रामचे सीईओ आणि इतर अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. यात, इंस्टाग्रामवर शिव शब्द सर्च केल्यास शिवशंकरांचा फोटो चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात येत आहे. यात भगवान शिवशंकरांच्या एका हातात वाईनचा ग्लास आणि दुसऱ्या हातात फोन दाखविण्यात आला आहे, असे मनीष सिंह यांनी म्हटले आहे. मनीष सिंह यांनी यासंदर्भात काही फोटोही शेअर केले आहेत.

देशातील सर्वात वाईट भाषा कोणती? Googleच्या उत्तरानं उद्भवला वाद; नाराजीनंतर मागितली माफी

काही दिवसांपूर्वी गुगलवर देशातील सर्वात खराब भाषा (Ugliest language in India) असे सर्च केल्यानंतर कन्नड भाषेचे नाव येत होते. या उल्लेखानंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर Google ने जाहीर माफी मागत गैरसमज आणि भावना दुखावल्यामुळे कंपनी दिलगीर आहे, असे म्हटले होते. याच प्रमाणे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक मुद्दे वादाचा विषय ठरत आहेत.

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामHinduismहिंदुइझमHinduहिंदूPoliceपोलिसBJPभाजपा