शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
2
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
3
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
4
जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
5
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
6
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
7
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
8
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
10
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
11
हनिमूनच्या रात्री नवरी फक्त 'हे' म्हणाली, नवरदेव निघून गेला अन् परतलाच नाही; नेमकं काय घडलं?
12
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
13
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
14
स्मृती मंधानाला चीट केल्याची चर्चा, लग्नही पुढे ढकललं; सर्व प्रकारानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला
15
चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
16
समांथा रुथ प्रभूने गुपचुप केलं दुसरं लग्न? 'द फॅमिली मॅन'च्या दिग्दर्शकासोबत संसार थाटल्याच्या चर्चा
17
वरमाला झाली, वधू स्टेजवरून उतरली... अन् थेट प्रियकरासोबत पळून गेली! सप्तपदीपूर्वीच लग्नात मोठा राडा
18
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठी आर्थिक विधेयकं संसदेत मांडली जाणार
19
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
20
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेते म्हणजे बोगस रामभक्त - शिवसेना नेत्याची टीका

By admin | Updated: April 13, 2015 09:40 IST

शिवसेनेचे उत्तरप्रदेशमधील नेते अनिल सिंह यांनी भाजपाला बोगस रामभक्त असे संबोधित करत उत्तरप्रदेशमध्ये सत्तेवर आल्यास राम मंदिर बांधू असे आश्वासन दिले आहे.

ऑनलाइन लोकमत 
लखनौ, दि. १३ - महाराष्ट्र व केंद्रात भाजपाला साथ देणा-या शिवसेनेने आता उत्तरप्रदेशमध्ये भाजपावर कुरघोडी करण्याची रणनिती आखली आहे. शिवसेनेचे उत्तरप्रदेशमधील नेते अनिल सिंह यांनी भाजपाला बोगस रामभक्त असे संबोधित करत उत्तरप्रदेशमध्ये सत्तेवर आल्यास राम मंदिर बांधू असे आश्वासन दिले आहे.  
उत्तरप्रदेशमध्यए २०१७ मध्ये विधानसभा निवडणूक होणार असून यासाठी शिवसेनेने आत्तापासूनच कंबर कसली आहे आहे. शिवसेना उत्तरप्रदेश विधानसभेच्या सर्व जागा (४०३ जागा) लढवेल अशी घोषणा अनिल सिंह यांनी केली आहे. या शिवाय राम मंदिरचा प्रश्न हाती घेत शिवसेनेने उत्तरप्रदेशमधील हिंदू मतांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. 'आम्ही जे सांगतो तेच करतो, जनतेने बोगस रामभक्तांपासून सावधान राहावे असे सांगत अनिल सिंह यांनी भाजपावर निशाणा साधला. केंद्रात सत्तेवर येऊनही भाजपा अयोध्येत राम मंदिर बांधत नसल्याने भाजपा नेते हे बोगस रामभक्त आहेत असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. मुसलमानांचा आरक्षण देऊन त्यांचा विकास होणार नाही. तर नसबंदी व फक्त दोन अपत्याचे बंधन घातल्यावर मुसलमान समाजाचा विकास होईल असेही त्यांनी सांगितले. उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्ष हा नमाजवादी पक्ष बनल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली.