शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

"कृषी मंत्री असताना पवारांनी शेती सोडून IPL स्पर्धा भरवलेल्या चालतात पण सचिनने..." 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 1:59 PM

रिहानाच्या ट्वीटनंतर सचिन तेंडुलकरनं केलेल्या ट्वीटवरून अनेकांनी केली होती टीका

ठळक मुद्देरिहानाच्या ट्वीटनंतर सचिन तेंडुलकरनं केलेल्या ट्वीटवरून अनेकांनी केली होती टीकाइतर विषयांवर बोलताना काळजी घेण्याचा पवारांनी सचिनला दिला होता सल्ला

''भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारताला चांगले ओळखतात, यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंध रहायला हवा,''असं ट्विट सचिननं केलं होतं. त्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सचिन तेंडुलकरला एक सल्ला दिला होता. यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. "कृषी मंत्री असताना आपलं शेती क्षेत्र सोडून क्रिकेटच्या आयपीएल स्पर्धा भरवलेल्या चालतात. पण सचिनने राष्ट्रहिताच्या बाजूने आपलं मत मांडलं ते 'राष्ट्रवादी' काँग्रेसच्या अध्यक्षांना चालत नाही," असं म्हणत भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पवार यांच्यावर निशाणा साधला. काय म्हणाले होते शरद पवार?सचिन तेंडुलकरने केलेल्या शेतकऱ्याबाबतच्या विधानानंतर अनेक लोकं आक्रमक झाली होती. "आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना सचिन तेंडुलकरने काळजी घ्यावी, असा माझा सल्ला राहिल," असं शरद पवारांनी सांगितलं. तसेच इतके दिवस शेतकरी जर रस्त्यावर बसतायत तर त्याचा विचार करायला पाहीजे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. हे खरं तर चांगलं नाही, असंही ते म्हणाले होते. "नरेंद्र सिंह तोमर यांचा अनादर करण्याचा हेतू नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुढाकार घ्यायला हवा. कदाचित त्यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे," असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. "स्वातंत्र्यानंतर कधी असं घडलं नाही. सरकारने ही टोकाची भूमिका घेतल्यावरुन त्यांचे धोररण स्पष्ट होतंय. अन्नदाता जर रस्त्यावर बसतोय तर त्याला प्रतिसाद दिला पाहिजे," असंही शरद पवारांनी केंद्र सरकारला सांगितलं होतं.काय म्हटलं होतं सचिननं?आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना हिनं शेतकरी आंदोलनाबाबद ट्विट केल्यानंतर तिला भारतीयांच्या रोषाचा सामना करावा लागला. सचिननं केलेलं ट्वीट हे रिहानाला अप्रत्यक्ष सुनावणारे होते. ''भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारताला चांगलं ओळखतात, यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंध रहायला हवा,''असं ट्वीट सचिननं केलं होतं. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSachin Tendulkarसचिन तेंडुलकरIPLआयपीएलFarmers Protestशेतकरी आंदोलनRihannaरिहानाTwitterट्विटर