"कृषी मंत्री असताना पवारांनी शेती सोडून IPL स्पर्धा भरवलेल्या चालतात पण सचिनने..." 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 01:59 PM2021-02-07T13:59:04+5:302021-02-07T14:03:25+5:30

रिहानाच्या ट्वीटनंतर सचिन तेंडुलकरनं केलेल्या ट्वीटवरून अनेकांनी केली होती टीका

bjp leader atul bhatkhalkar criticize ncp sharad pawar minister of agriculture cricket match ipl in india | "कृषी मंत्री असताना पवारांनी शेती सोडून IPL स्पर्धा भरवलेल्या चालतात पण सचिनने..." 

"कृषी मंत्री असताना पवारांनी शेती सोडून IPL स्पर्धा भरवलेल्या चालतात पण सचिनने..." 

googlenewsNext
ठळक मुद्देरिहानाच्या ट्वीटनंतर सचिन तेंडुलकरनं केलेल्या ट्वीटवरून अनेकांनी केली होती टीकाइतर विषयांवर बोलताना काळजी घेण्याचा पवारांनी सचिनला दिला होता सल्ला

''भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारताला चांगले ओळखतात, यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंध रहायला हवा,''असं ट्विट सचिननं केलं होतं. त्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सचिन तेंडुलकरला एक सल्ला दिला होता. यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. 

"कृषी मंत्री असताना आपलं शेती क्षेत्र सोडून क्रिकेटच्या आयपीएल स्पर्धा भरवलेल्या चालतात. पण सचिनने राष्ट्रहिताच्या बाजूने आपलं मत मांडलं ते 'राष्ट्रवादी' काँग्रेसच्या अध्यक्षांना चालत नाही," असं म्हणत भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पवार यांच्यावर निशाणा साधला. 



काय म्हणाले होते शरद पवार?

सचिन तेंडुलकरने केलेल्या शेतकऱ्याबाबतच्या विधानानंतर अनेक लोकं आक्रमक झाली होती. "आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना सचिन तेंडुलकरने काळजी घ्यावी, असा माझा सल्ला राहिल," असं शरद पवारांनी सांगितलं. तसेच इतके दिवस शेतकरी जर रस्त्यावर बसतायत तर त्याचा विचार करायला पाहीजे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. हे खरं तर चांगलं नाही, असंही ते म्हणाले होते. 

"नरेंद्र सिंह तोमर यांचा अनादर करण्याचा हेतू नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुढाकार घ्यायला हवा. कदाचित त्यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे," असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. "स्वातंत्र्यानंतर कधी असं घडलं नाही. सरकारने ही टोकाची भूमिका घेतल्यावरुन त्यांचे धोररण स्पष्ट होतंय. अन्नदाता जर रस्त्यावर बसतोय तर त्याला प्रतिसाद दिला पाहिजे," असंही शरद पवारांनी केंद्र सरकारला सांगितलं होतं.

काय म्हटलं होतं सचिननं?

आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना हिनं शेतकरी आंदोलनाबाबद ट्विट केल्यानंतर तिला भारतीयांच्या रोषाचा सामना करावा लागला. सचिननं केलेलं ट्वीट हे रिहानाला अप्रत्यक्ष सुनावणारे होते. ''भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारताला चांगलं ओळखतात, यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंध रहायला हवा,''असं ट्वीट सचिननं केलं होतं. 

Web Title: bjp leader atul bhatkhalkar criticize ncp sharad pawar minister of agriculture cricket match ipl in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.