एका हातात चप्पल, दुसऱ्या हातात काठी; भररस्त्यात भाजप नेत्यानं महिला आणि तिच्या मुलाला मारलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 14:39 IST2025-07-02T14:38:18+5:302025-07-02T14:39:49+5:30
BJP Leader Ateeq Pathan Viral Video: भाजप नेते अतीक पठाण यांनी भररस्त्यात एक महिला आणि तिच्या मुलाला चप्पल आणि काठीने मारहाण केली.

एका हातात चप्पल, दुसऱ्या हातात काठी; भररस्त्यात भाजप नेत्यानं महिला आणि तिच्या मुलाला मारलं!
भाजप नेते अतीक पठाण यांनी भररस्त्यात एक महिला आणि तिच्या मुलाला चप्पल आणि काठीने मारहाण केली. याप्रकरणी अतीक पठाण यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विरोधकांनी आणि नेटकऱ्यांनी अतीक पठाण यांच्या अशा कृत्याबद्दल संताप व्यक्त केला. ही घटना रोजी बिलासपूर शहरातील दनकौर भागात सोमवारी (३० जून २०२४) घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकिना रहमान असे पीडित महिलेचे नाव आहे. पीडिता गेल्या १५ वर्षांपासून बिलासपूरमध्ये राहत आहे आणि मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. वीजेच्या तारा बसवण्यावरून पीडितेचा शेजारी राहणाऱ्या एका महिलेची वाद झाला. त्यावेळी अतीक पठाण यांनी हा वाद मिटवण्याऐवजी पीडिताला आणि तिच्या मुलाला चप्पल आणि काठीने मारहाण केली. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अतीक पठाण यांच्या एका हातात चप्पल आणि दुसऱ्या हातात काठी दिसत आहे.
उत्तर प्रदेश के जिला गौतमबुद्धनगर के ग्रेटर नोएडा में भाजपा के कासना मंडल मंत्री ने मजदूर महिला सकीना और उसके बेटे सफीकुर्रहमान को चप्पल और डंडे से बुरी तरह पीटा। वही भाजपा, जो मंच से “बेटी बचाओ” का नारा देती है, उसके नेता सड़क पर बेटियों और उनके परिवार पर कहर बरपा रहे हैं!
— Aazad Samaj Party - Kanshi Ram (@AzadSamajParty) July 1, 2025
यह… pic.twitter.com/5b5CBWqibX
या घटनेवर आझाद समाज पक्षाने आपली प्रतिक्रिया दिली. "उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील ग्रेटर नोएडा येथे भाजपच्या कसना मंडळाच्या मंत्र्यांनी सकिना आणि तिच्या मुलाला सफीकुर रहमान या मजुर महिलेला चप्पल आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. स्टेजवरून 'बेटी बचाओ'चा नारा देणाऱ्या भाजपचे नेते रस्त्यावर मुली आणि त्यांच्या कुटुंबांवर अत्याचार करत आहेत. ही घटना केवळ एका महिलेवर हल्ला नाही तर सत्तेच्या अहंकाराचे प्रदर्शन आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये भाजप नेते कायद्याला कसे त्यांची मालमत्ता समज आहेत, हे स्पष्टपणे दिसून येते", असे त्यांनी म्हटले आहे. तसेच आरोपी भाजप नेत्याविरुद्ध गंभीर कलमांखाली एफआयआर दाखल करावा. पीडित महिला आणि तिच्या मुलाला सुरक्षा आणि न्याय द्यावा, अशी त्यांनी मागणी केली.
ही संपूर्ण घटना एका प्रत्यक्षदर्शीने कॅमेऱ्यात कैद केली आणि लवकरच हा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे जनतेकडून जोरदार टीका झाली. त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. दनकौर पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची दखल घेतली आहे आणि आरोपींविरुद्ध शांतता भंगाच्या आरोपाखाली कारवाई केली. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.