शहरं
Join us  
Trending Stories
1
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
2
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
3
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
4
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
5
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
6
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
7
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
8
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
9
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
10
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
11
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
12
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
13
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
14
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
15
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
16
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
17
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
18
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
19
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
20
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये विधानसभा जिंकण्यासाठी भाजपने आखला 'नवीन डाव'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 16:54 IST

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांच्या नकारात्मकेताचा सामना करावा लागत आहे. कारण, 2003 ते 2005 या कालावधीत राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून वसुंधराराजे यांची वर्णी लागली होती.

जयपूर - राजस्थानमधीलविधानसभा निवडणुकांमध्ये विजयी होण्यासाठी भाजपकडून रणनिती आखण्यात आली आहे. त्यानुसार, कोरी पाटी या तत्वानुसार भाजपकडून 100 नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपचा डाव आहे. अँटी इन्कंबन्सी लक्षात घेऊन भाजपने राजस्थानमधील विधानसभेच्या 200 जागांपैकी 100 जागांवर नवीन उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. 

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांच्या नकारात्मकेताचा सामना करावा लागत आहे. कारण, 2003 ते 2005 या कालावधीत राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून वसुंधराराजे यांची वर्णी लागली होती. त्यानंतर 2013 पासून वसुंधराराजे यांच्याकडेच राजस्थानची जबाबदारी आहे. त्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा फटका राजे यांना बसण्याची शक्यता आहे. तसेच राजस्थान सरकारमधील मंत्री गुलाबचंद्र कटारिया, मंत्री सुरेंद्र गोयल, युनुस खान आणि राजकुमार रिनवा या मंत्र्यांनाही वाढता विरोध आहे. त्यामुळे या मंत्र्यांना बाजूला बसविण्यात येऊ शकते. भाजपने 2008 मध्ये 68 उमेदवारांना तिकीट दिले होते. त्याच, उमेदवारांना 2003 मध्येही उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, या 68 उमेदवारांपैकी केवळ 28 जणांनाच विजय मिळाला होता. तर पराभूत उमेदवारांमध्ये 40 आमदार आणि 13 विद्यमान मंत्र्यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे 2013 च्या निवडणुकीतही भाजपने 2008 मधीलच 105 उमेदवारांना संधी होती. मात्र, तेव्हाही केवळ 14 उमेदवारांनाच निवडणूक जिंकला आली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जोखीम न उचलता, नवख्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपचा डाव आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाRajasthanराजस्थानvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक