शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

७११३ कोटींसह भाजप सर्वांत श्रीमंत पक्ष; काँग्रेसकडे किती निधी? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 09:42 IST

२०२२-२३ या कालावधीत भाजपने केलेल्या १०९२ कोटी रुपये इतक्या खर्चाच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये खर्चात ६० टक्के वाढ झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष अशी स्वत:ची ओळख करून देणारा भाजप हा देशातील सर्वांत श्रीमंत राजकीय पक्ष बनला असून ३१ मार्च २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार त्याच्याकडे ७११३.८० कोटी रुपयांचा निधी आहे, तर काँग्रेसकडे ८५७.१७ कोटी रुपयांचा निधी असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 

भाजपने २०२३-२४ या कालावधीत १७५४.०६ कोटी रुपये खर्च केले. २०२२-२३ या कालावधीत भाजपने केलेल्या १०९२ कोटी रुपये इतक्या खर्चाच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये खर्चात ६० टक्के वाढ झाली, तर काँग्रेसने २०२३-२४मध्ये ६१९.६७ कोटी रुपये खर्च केले. २०२२-२३मध्ये हे प्रमाण १९२.५६ कोटी रुपये होते. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या वार्षिक अहवालानुसार २०२३-२४मध्ये भाजपला निवडणूक रोख्यांच्या रूपाने १६८५.६९ कोटी रुपयांच्या ऐच्छिक देणग्या मिळाल्या. हेच प्रमाण २०२२-२३मध्ये १२९४.१५ कोटी रुपये होते. निवडणूक रोख्यांवर आता सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. २०२३-२४या वर्षामध्ये भाजपला सर्व मिळून २०४२.७५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. काँग्रेस पक्षाला २०२३-२४मध्ये १२२५.११ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या.

काँग्रेसचा भारत जोडो यात्रा-२ वर ४९.६३ कोटींचा खर्चकाँग्रेसच्या भारत जोडो यात्रा २ च्या आयोजनासाठी २०२३-२४ या कालावघीत ४९.६३ कोटी रुपये, तर त्याआधीच्या भारत जोडो यात्रेवर ७१.८४ कोटी रुपयांचा खर्च पक्षाने केला होता. 

भाजपचा जाहिरातींवर  ५९१ कोटींचा खर्च२०२३-२४मध्ये भाजपने जाहिरातींवर ५९१ कोटी रुपये खर्च केले. त्यातील ४३४.८४ कोटी इलेक्ट्रॉनिक माध्यमातील व ११५.६२ कोटी रुपये मुद्रित माध्यमांतील जाहिरातींवर खर्च झाले. पक्षाने २०२३-२४ या वर्षात हेलिकॉप्टर, विमान प्रवासासाठी १७४ कोटी रुपयांचा खर्च केला. भाजपने या वर्षात उमेदवारांना १९१.०६ कोटी रुपयांची मदत केली. भाजपने २०२४मध्ये सभांच्या आयोजनासाठी ८३.३२ कोटी रुपये तर मोर्चे, आंदोलने, काॅल सेंटर आदी गोष्टींकरिता ७५.१४ कोटी खर्च केले. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग