शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत सरकार स्थापनेची भाजपाकडून चाचपणी

By admin | Updated: September 7, 2014 03:04 IST

भाजपा सरकार स्थापनेच्या शक्यता तपासून पाहात आह़े विशेष म्हणजे अशा शक्यता तपासण्यात काहीही अनैतिक नसल्याचे पक्षनेतृत्वाचे मत आह़े

काही अनैतिक नसल्याचा दावा : केजरीवालांचे मात्र मध्यस्थीसाठी राष्ट्रपतींना साकडे
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सरकार स्थापनेसाठी भाजपाकडून घोडेबाजार सुरूअसून राष्ट्रपतींनी या प्रकरणी मध्यस्थी करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी पुढे रेटली असतानाच भाजपा मात्र सरकार स्थापनेच्या शक्यता तपासून पाहात आह़े विशेष म्हणजे अशा शक्यता तपासण्यात काहीही अनैतिक नसल्याचे पक्षनेतृत्वाचे मत आह़े
दिल्लीत सरकार स्थापनेत काहीही अनैतिक नाही, असे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आह़े तिकडे केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी घोडेबाजाराचा आरोप धुडकावून लावत नायब राज्यपालांकडून सरकार स्थापनेचे औपचारिक निमंत्रण मिळाल्यानंतर पक्ष आपला निर्णय जाहीर करेल, असे स्पष्ट केले आह़े दिल्लीत निवडणुका न घेता सरकार स्थापनेच्या मुद्दय़ावर प्रदेश भाजपात मतभेद असल्याचे मानले जात आह़े मात्र सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, 
भाजपा नेतृत्वाने यासाठी अनुकूलता दर्शवली आह़े तथापि या आठवडय़ात होऊ घातलेल्या नवगठित भाजपा संसदीय बोर्डाच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय अपेक्षित आह़े
सर्वात मोठय़ा पक्षाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्याची परवानगी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी राष्ट्रपतींकडे मागितल्याने विधानसभेत बहुमत नसतानादेखील भाजपाला दिल्लीत सरकार स्थापनेची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली. जंग यांनी राष्ट्रपतींना पाठविलेल्या अहवालात दिल्लीतील राजकीय परिस्थितीचे सविस्तर विश्लेषण केले असून, दिल्लीत निर्वाचित सरकार गरजेचे असल्याचे नमूद केले आहे. या पाश्र्वभूमीवर  शनिवारी एका खासगी वाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना, पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी भाजपाला दिल्लीत सरकार स्थापनेचा अधिकार असल्याचे म्हटले आह़े भाजपा हा सर्वात मोठा पक्ष आह़े दिल्लीच्या जनतेचा हा जनाधार आह़े अशा स्थितीत दिल्लीत सरकार स्थापनेसाठी समर्थन मिळविण्यात मला काहाही अनैतिक वाटत नाही़ दिल्लीत नव्याने निवडणुका कुणालाच नको आहेत, असेही ते म्हणाल़े दिल्लीचे राज्यपाल भाजपाला राज्यात सरकार स्थापनेसाठी आमंत्रण देणार असल्याचे वृत्त असतानाच, असे औपचारिक आमंत्रण मिळाल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे राजनाथसिंह यांनी सांगितल़े 
दिल्लीत सरकार स्थापनेसाठी भाजपाकडून घोडेबाजार करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी धुडकावून लावला़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
घोडेबाजाराची शंका
आम आदमी पार्टीचे सव्रेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सरकार स्थापनेसंदर्भात मध्यस्थी करावी, असे साकडे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना घातले आह़े दिल्लीच्या नायब राज्यपालांनी भाजपाला कुठल्या आधारावर सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्याची परवानगी मागितली आहे, असा सवालही त्यांनी केला आह़े 
 
भाजपाकडे पुरेसे संख्याबळ नाही़ अशा स्थितीत आमदारांची खरेदी करून भाजपा सरकार स्थापन करू इच्छित़े भाजपाने यासाठी घोडेबाजार चालवला आह़े म्हणूनच राष्ट्रपतींनी या प्रकरणी मध्यस्थी करावी असे आम्हाला वाटते, असे केजरीवाल म्हणाल़े