शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने टीम बदलली! महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांना नड्डांनी हटवले; तावडे, मुंडे, रहाटकर यांचे स्थान कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 06:51 IST

स्वत: सी. टी. रवी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक जिंकू शकले नव्हते.

संजय शर्मा -

नवी दिल्ली : २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आपल्या ३८ सदस्यीय टीमची घोषणा केली आहे. महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदावरून हटविले आहे. विनोद तावडे यांना पुन्हा राष्ट्रीय महासचिव केले आहे तर पंकजा मुंडे व विजया रहाटकर यांना राष्ट्रीय सचिवपदावर पुन्हा स्थान दिले आहे. सी. टी. रवी यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदावरून हटवून हाच संदेश दिला आहे की, कर्नाटकमध्ये बी. एस. येदीयुरप्पा यांच्याविरोधात राजकारण करण्याचा परिणाम भाजपला कर्नाटकमध्ये सरकार गमावून भोगावा लागला. स्वत: सी. टी. रवी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक जिंकू शकले नव्हते.

पंकजा यांचे मन वळविण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे यांच्या पवित्र्यानंतर त्यांचे मन वळविण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून याकडे पाहिले जात आहे. त्या मध्य प्रदेशच्या सह प्रभारीही आहेत व नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्राचे सुनील देवधर यांना राष्ट्रीय सचिव पदावरून हटविले आहे. ते आंध्रप्रदेशचे सहप्रभारी होते. 

विजयवर्गीय नवे प्रभारी? -सी. टी. रवी यांच्याकडे असलेला महाराष्ट्राचा प्रभार कैलास विजयवर्गीय यांच्याकडे सोपविला जाण्याची दाट शक्यता आहे. विजयवर्गीय हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विश्वासू मानले जातात. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांच्या नावाचाही पर्याय भाजपश्रेष्ठींपुढे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :BJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाPankaja Mundeपंकजा मुंडेVinod Tawdeविनोद तावडेVijaya Rahatkarविजया रहाटकरMaharashtraमहाराष्ट्र