शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

अमित शहांनी सोडवला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा; एका दिवसात प्रश्न मिटला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 9:37 PM

दिल्लीतील घडामोडींनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाचा प्रश्न मार्गी

नवी दिल्ली: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. मात्र हरयाणातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला आहे. भाजपा, जेजेपीनं आघाडी करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. दोन्ही पक्षांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार भाजपाकडे मुख्यमंत्रीपद असेल. तर जेजेपीला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येईल. हरयाणाच्या जनतेनं दिलेला जनादेश लक्षात घेऊन आम्ही (भाजपा-जेजेपी) सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचं अमित शहांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितलं. 'दोन्ही पक्षात झालेल्या चर्चेतून आघाडीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुख्यमंत्री भाजपाचा, तर उपमुख्यमंत्री जेजेपीचा असेल. उद्या आम्ही राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करू,' असं अमित शहा म्हणाले.अमित शहांनंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. हरयाणात आम्ही जेजेपीसोबत सरकार स्थापन करणार आहोत. याआधीदेखील आम्ही एकमेकांना मदत केली आहे. यावेळी दुष्यंत चौटाला यांनी भाजपा आणि जेजेपी एकत्र येणं राज्यासाठी महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. राज्याला स्थिर सरकार देणं गरजेचं आहे. त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. याबद्दल मी भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आभारी आहे. दोन्ही पक्ष स्थिर सरकार देऊन राज्याच्या प्रगतीसाठी काम करतील, असं चौटाला म्हणाले. 

टॅग्स :haryana election 2019हरियाणा निवडणूकAmit Shahअमित शहाBJPभाजपा