शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातेतून राज्यसभेच्या दोन जागांसाठी भाजप-काँग्रेस संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 07:09 IST

दोघांचेही दावे : काँग्रेसची एकाच तारखेला मतदान घेण्याची मागणी

शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी लोकसभा सदस्य बनल्यामुळे गुजरातमधून राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या या दोन जागांसाठी भाजप आणि काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. या दोन्ही जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत तर संख्या बळाच्या आधारावर काँग्रेस एका जागेवर दावा करीत आहे, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

या दोन्ही जागा आपल्या ताब्यात याव्यात यासाठी भाजप निवडणूक आयोगाच्या मदतीने रिक्त झालेल्या जागांची अधिसूचना वेगवेगळी जारी करण्यात यशस्वी झाल्यानंतर या दोन्ही जागांसाठी वेगवेगळ्या तारखांना निवडणूक व्हावी अशी योजना तो बनवत आहे.भाजपच्या या योजनेचा सुगावा लागताच काँग्रेसने उत्तर देणारी व्यूहरचना करून निवडणूक आयोगाला निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजे या दोन जागांसाठी वेगवेगळ््या तारखांना मतदान घेतले जाऊ नये.काँगे्रसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी भाजपच्या या प्रयत्नाचा खुलासा म्हणाले की, भाजप निवडणूक आयोगाचा वापर करून दोन जागांसाठी वेगवेगळ््या तारखांना मतदान घेण्याचा कट आखत आहे. असाच कट त्याने अहमद पटेलयांना राज्यसभा निवडणुकीत हरवण्यासाठी आखला होता. तसाच कट या निवडणुकीतही आखून आमदारांची खरेदी भाजपला करता येईल.जुन्या परंपरेचे पालन भाजपची एक जागा कमीगुजरात विधानसभेत काँग्रेसला ७१ आमदारांचा पाठिंबा असून भाजपला १८२ सदस्यांच्या (सध्या ती घटून १७५ सदस्यांची बनली आहे) विधानसभेत १०० आमदारांचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एक आणि बीटीपीला दोन आमदारांचा पाठिंबा आहे. या संख्याबळानुसार जर निवडणूक आयोगाने जुन्या परंपरेचे पालन करून एकाच तारखेला निवडणूक घेतली तर काँग्रेस भाजपकडून एक जागा हिसकावून घेण्यात यशस्वी ठरेल. परंतु, काँग्रेसला संशय आहे की, निवडणूक आयोगाच्या मदतीने एकाच तारखेला मतदान घेतले जाऊ नये म्हणून भाजप सगळे उपाय करील. म्हणजे दोन्ही जागा त्याला ताब्यात ठेवता येतील.

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाGujaratगुजरात