BJP: 4 राज्यांसाठी भाजपने केली केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती, अमित शहांकडे यूपीची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 07:17 PM2022-03-14T19:17:29+5:302022-03-14T19:26:02+5:30

BJP: चार राज्यांपैकी यूपी, उत्तराखंड आणि मणिपुरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, तर गोव्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

BJP: BJP appoints central inspectors for 4 states, Amit Shah in charge of UP | BJP: 4 राज्यांसाठी भाजपने केली केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती, अमित शहांकडे यूपीची जबाबदारी

BJP: 4 राज्यांसाठी भाजपने केली केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती, अमित शहांकडे यूपीची जबाबदारी

Next

नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीत चार राज्यांतील विजयानंतर आता भाजपने सरकार स्थापनेची तयारी जोरात केली आहे. पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत पंजाब वगळता इतर सर्व राज्ये भाजपच्या ताब्यात आली आहेत. यूपीमध्ये त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्याचबरोबर उत्तराखंड आणि मणिपूरमध्येही सरकार परतले आहे. गोव्यातही भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

अमित शहा यांच्याकडे यूपीची जबाबदारी आहे
आता भाजपने या राज्यांमध्ये सरकार स्थापनेसाठी केंद्रीय पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी केंद्रीय नेते राज्यांमध्ये पाठवले जाणार असून मंत्र्यांच्या नावावरही चर्चा होऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि रघुवर दास यांना यूपीसाठी निरीक्षक बनवण्यात आले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मीनाक्षी लेखी यांची उत्तराखंडमध्ये निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मणिपूरमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू निरीक्षक म्हणून जाणार आहेत. नरेंद्र सिंह तोमर आणि एल मुरुगन यांना गोव्यात निरीक्षक बनवण्यात आले आहे. या सर्व राज्यांमध्ये गोवा हे सर्वात महत्त्वाचे राज्य आहे कारण 40 सदस्यांच्या विधानसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही, पण 20 जागांसह भाजप नक्कीच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

गोव्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे
गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, मात्र चार दिवस उलटले तरी भाजपने अद्याप सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. निवडणुकीत 40 सदस्यांच्या विधानसभेत भाजपने सर्वाधिक 20 जागा जिंकल्या. तीन अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (एमजीपी) दोन सदस्यांनी आधीच भाजपला पाठिंबा दिल्याने भाजप सहज सरकार स्थापन करू शकतो. पण, भाजपमध्ये स्थानिक अंतर्गत वाद असल्यामुळे सर्वांच्याच नजरा गोव्याकडे लागल्या आहेत.

Web Title: BJP: BJP appoints central inspectors for 4 states, Amit Shah in charge of UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.