भाजप सगळ्या जाती, समाजाचा : अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 00:20 IST2018-09-17T00:19:56+5:302018-09-17T00:20:34+5:30
भारतीय जनता पक्ष सगळ्या जाती आणि समाजासाठी काम करतो, असे पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले

भाजप सगळ्या जाती, समाजाचा : अमित शहा
जयपूर : भारतीय जनता पक्ष सगळ्या जाती आणि समाजासाठी काम करतो, असे पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी येथे म्हटले. कोणत्याही एका जातीचा किंवा पक्षाचा नाही हेच भाजपचे वैशिष्ट्य आहे. आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, ‘सबका साथ, सबका विकास’ हाच विकासाचा मंत्र आहे.
देशातील प्रत्येकाला विकासाची संधी मिळायला पाहिजे, असे शहा पाली जिल्ह्यातील कार्यक्रमात बोलताना म्हणाले. ‘भाजपपर कभी किसी समाज का थप्पा नही लगा’, असे सांगून शहा म्हणाले, भाजपमध्ये माळी, गुर्जर, जाट आणि इतर जातींचे लोक आहेत. भाजप हा सगळ्यांचा पक्ष बनला आहे.
२०१४ मध्ये पंतप्रधान बनल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सगळ्या मागासवर्गांच्या विकासासाठी काम केले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानने सर्व २५ जागा जिंकून महत्त्वाची भूमिका बजावली होती.