घरबसल्या २५ रुपयांत करता येणार श्री सोमनाथ महादेवाची बिल्वपूजा; ट्रस्टकडून भक्तांसाठी खास सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 07:39 IST2025-06-30T07:38:10+5:302025-06-30T07:39:10+5:30

‘जन जन का सोमनाथ’ या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत, कोणताही भक्त आपल्या घरून ऑनलाइन २५ रुपयांमध्ये ही पूजा नोंदवू शकतो.

Bilva Puja of Shri Somnath Mahadev can be done at home for Rs 25; Special service for devotees from Shri Somnath Trust | घरबसल्या २५ रुपयांत करता येणार श्री सोमनाथ महादेवाची बिल्वपूजा; ट्रस्टकडून भक्तांसाठी खास सेवा

घरबसल्या २५ रुपयांत करता येणार श्री सोमनाथ महादेवाची बिल्वपूजा; ट्रस्टकडून भक्तांसाठी खास सेवा

सोमनाथ : श्रावण महिन्यात शिवभक्तांना सोमनाथाची घरबसल्या बिल्वपूजा करता येणार आहे. श्री सोमनाथ ट्रस्टने केवळ २५ रुपयांत ही सेवा पुन्हा सुरू केली आहे. यापूर्वी दोन वर्षांत ७.५ लाख शिवभक्तांनी या पूजेचा लाभ घेतला आहे.

‘जन जन का सोमनाथ’ या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत, कोणताही भक्त आपल्या घरून ऑनलाइन २५ रुपयांमध्ये ही पूजा नोंदवू शकतो. ट्रस्टच्या संकेतस्थळावरून किंवा क्यूआर कोडच्या माध्यमातून ही प्रक्रिया काही क्षणांत पूर्ण करता येते, अशी माहिती ट्रस्टने दिली आहे.

बिल्वपत्रे थेट सोमनाथ ज्योतिर्लिंगावर अर्पण केली जातात आणि त्यासोबत प्रत्येक भक्ताचे नाव मंत्रोच्चारात समाविष्ट करून विधिवत पूजा केली जाते, असेही ट्रस्टने सांगितले.

रुद्राक्ष, भस्म मिळते पोस्टाने

या पूजेनंतर ट्रस्टकडून प्रत्येक नोंदणीकृत भक्ताच्या पत्त्यावर पवित्र रुद्राक्ष, गंध आणि भस्म पाठवले जाते. काही भाविकांना प्रसाद वेळेवर न मिळाल्यास ट्रस्टकडून पुन्हा प्रसाद पाठवण्यात आला आहे किंवा मंदिर कार्यालयातून तो उपलब्ध करून देण्यात आला.

२०२३ पासून ट्रस्टने ही सेवा श्रावण व महाशिवरात्री या विशेष पर्वांमध्ये सुरू केली असून, आजवर ७.५० लाखांहून अधिक कुटुंबांनी या पूजेत सहभाग घेतला आहे.

Web Title: Bilva Puja of Shri Somnath Mahadev can be done at home for Rs 25; Special service for devotees from Shri Somnath Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.