शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

अब्जावधी डॉलरच्या हेलिकॉप्टर सौद्याला मंजुरी

By admin | Updated: September 22, 2015 22:41 IST

मंत्रिमंडळाच्या संरक्षणविषयक समितीने (सीसीएस) अब्जावधी डॉलर्सच्या अमेरिकन बोर्इंग विमान कंपनीकडून २२ अ‍ॅपाचे अटॅक हेलिकॉप्टर आणि १५ शिनूक हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर्सच्या सौद्याला मंजुरी दिली आहे

नवी दिल्ली : मंत्रिमंडळाच्या संरक्षणविषयक समितीने (सीसीएस) अब्जावधी डॉलर्सच्या अमेरिकन बोर्इंग विमान कंपनीकडून २२ अ‍ॅपाचे अटॅक हेलिकॉप्टर आणि १५ शिनूक हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर्सच्या सौद्याला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अमेरिका दौऱ्यावर जात असून त्यापूर्वी तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आला.या हेलिकॉप्टर्सच्या उत्पादन खर्चाबाबत २०१३ मध्ये चर्चा सुरू झाली होती. सुमारे अडीच अब्ज डॉलरच्या या सौद्याबाबत यावर्षी जूनमध्ये अमेरिकेचे संरक्षणमंत्री अ‍ॅश्टन कार्टर यांच्या भारत दौऱ्यावर करारावर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा होती. अ‍ॅपाचे हेलिकॉप्टरचा सौदा बोर्इंग कंपनीसोबत केला जाणार असून त्यावर वापरली जाणारी शस्त्रे, रडार आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध उपकरणांसाठी अमेरिकेशी करार केला जाईल. भारतात संरक्षण क्षेत्रातील वाढत्या बाजारात आपले अस्तित्व आणखी बळकट करण्याच्या उद्देशाने अमेरिकेने या करारात स्वारस्य दाखविले आहे. सांकेतिक भाषा संशोधनशिक्षण आणि कार्यस्थळी किमान पन्नास लाख कर्णबधिरांना प्रवेश सुलभ व्हावा यासाठी राष्ट्रीय स्तरावर सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण संस्था उभारण्याला सरकारने मंजुरी दिली. मूक-बधिरांना प्रशिक्षण देण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात येत असल्याचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांना या बैठकीची माहिती देताना सांगितले. उच्च शिक्षणात विशेषत: संशोधन, कौशल्य विकास आणि शाखा विकासात जर्मनीसोबत संबंध बळकट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. संयुक्त राष्ट्र अजेंड्यावर चर्चासंयुक्त राष्ट्राच्या सातत्यपूर्ण विकास २०३० या अजेंड्याबाबत भारताची भूमिका स्पष्ट करणारे भाषण पंतप्रधान मोदी देणार असून त्यावर केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)